जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / अवघ्या पाव टक्का रुग्णवाढीने रोखला पिंपरी-चिंचवडकरांचा मार्ग, निर्बंधात आणखी शिथिलता नाही

अवघ्या पाव टक्का रुग्णवाढीने रोखला पिंपरी-चिंचवडकरांचा मार्ग, निर्बंधात आणखी शिथिलता नाही


अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

Restrictions in Pimpri Chinchwad: पुण्यातील रुग्णवाढ कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, त्याच दरम्यान पिंपरीतील निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीयेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 11 जून: पुणे शहरातील (Pune City) कोरोना रुग्णवाढीचा (Covid patient positivity rate) दर हा पाच टक्के असल्याने निर्बंध (restrictions) आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याच दरम्यान पुण्याच्या शेजारील पिंपरी चिंचवडला अवघ्या पाव टक्के रुग्णवाढीमुळे निर्बंधांतून शिथिलता मिळालेली नाहीये. पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध (Pimpri Chinchwad restrictions) आठवडाभर कायम राहणार असल्याचे पालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.2 टक्के, तर पुण्याचा 5 टक्के असल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी दिली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दुकाने, हॉटेल्स ही चार वाजेपर्यंतच नियम पाळून उघडी राहणार आहेत. मॉल बंदच असतील. 5.2 म्हणजे अवघा पाव टक्का कोरोना रुग्णवाढ अधिक असल्याने पिंपरी-चिंचवडला कोरोना निर्बंधातून आणखी मोकळीक आज मिळू शकली नाही. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांबरोबर रहिवाशांचाही काहीसा हिरमोड झाला आहे. सोमवारपासून पुणेकरांना आणखी दिलासा, नियम शिथिल होणार पुण्यातील निर्बंध आणखी शिथिल कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या संदर्भात पाच स्तर निश्चित केले आहेत. आता पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्य सरकारने निश्चित केलेल्या या पाच स्तरांनुसार कोरोना संसर्गचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत असल्यास निर्बंध शिथिल करण्यात येतील. पुण्यातील दुकाने आता संध्याकाळी सातपर्यंत सुरू राहणार आहेत. 50 टक्के क्षमतेने ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी. हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यासिका, ग्रंथालये 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार आहेत. मॉल सुद्दा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सिनेमा, नाट्यगृह बंद राहणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात