• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • Pune Police : पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेंचा उपचारादरम्यान मृत्यू

Pune Police : पोलीस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या सुरेश पिंगळेंचा उपचारादरम्यान मृत्यू

बुधवारी साडे अकराच्या सुमारात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना ससून आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 • Share this:
  पुणे, 19 ऑगस्ट : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस (Pune Police) आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सुरेश पिंगळे असं या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. यासाठी पुणे पोलिसांना जबाबदार धरलं जात आहे. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या पत्नीने न्यायाची मागणी केली आहे. सुरेश पिंगळे हे पुण्यातील ए आर डी  ए या शासकीय संस्थेत कंत्राटी पद्धतीवर काम करीत होते. दरवर्षी कंत्राट नूतनीकरण करण्यासाठी त्यांना पोलिसांकडून त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे व्हेरिफिकेशन करुन घ्यावे लागते. या वर्षीच्या व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसाठी त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र सुरेश पिंगळे नावाच्या व्यक्तीवर तीन गुन्हे नोंद असल्याच त्यांना सांगण्यात आलं. सुरेश पिंगळेंनी तो व्यक्ती वेगळा असल्याचं आणि एकाच नावाच्या दोन व्यक्ती असल्याचे सांगितलं. मात्र पोलीसांनी दाद दिली नाही. (Suresh Pingale who tried to set himself on fire in front of the Commissionerate of Police died during treatment) यानंतर वारंवार ते पुणे पोलिसांना आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली नसल्याने निराश झालेले सुरेश पिंगळे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या (Pune Police Commissioner) समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर भाजले होते. त्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नोकरीसाठी त्यांनी पुण्यातील अनेक वरिष्ठांची भेट घेतली होती. हे ही वाचा-Pimpri-Chinchwad : सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष लाच प्रकरणात अटक मात्र कोणीत त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी साडे अकराच्या सुमारात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना ससून आणि त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान यावेळी त्यांनी पत्नीला एक महत्त्वाची बाब सांगितली, त्यानुसार खडकी पोलीस स्टेशनमधील पोखरकर नावाचा महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्रास दिल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त झीने प्रसिद्ध केलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: