पुणे, 18 ऑगस्ट :9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे (BJP Standing Committee Chairman Nitin Landage) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात पुणे लाचलुचपत (ACB) विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कारवाईचं सत्र सुरू आहे. 9 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात थेट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचं नाव आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याशिवाय अरविंद कांबळे, राजेंद्र शिंदे या लिपिकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे. 9 लाख लाच प्रकरणात तब्बल 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचं सांगितलं जात आहे. टेंडर मंजुरीनंतर वर्क ऑर्डर काढण्याकरिता ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा-पुणे तिथं काय उणे! पुण्यात उभारलं चक्क पंतप्रधान मोदींचं मंदिर
महापालिकेत सर्व साधारण सभा सुरू असताना मारली धाड
आज महापालिकेत सर्व साधारण सभा सुरू असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली होती. स्थायी समिती सभापतींच्या कार्यालयीन प्रमुखासह अन्य कर्मचा-यांना ताब्यात घेऊन एसीबीचे अधिकारी चौकशी करीत होते. एसीबीच्या धाडेने महापालिका परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची चौकशी देखिल एसीबीचे अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. एसीबीच्या धाडेमुळे महापालिकेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. एसीबीच्या धाडे बद्दल महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी बोलण्यास टाळा टाळ करत आहेत. मात्र विरोधी पक्षाकडून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे.
पिंपरी नितीन लांडगे लाच प्रकरणात भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांना प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांची अटक निश्चित झाली असून त्यांचा सहभाग निश्चित झाला आहे, अशी माहिती राजेंद्र बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (पुणे) यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Crime, Pimpari chinchavad, Pune