मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Police Raid Party : लोणावळ्यात चाललं काय? आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले

Pune Police Raid Party : लोणावळ्यात चाललं काय? आलिशान हॉटेलमध्ये न्यूड डान्स, 9 महिलांसह 44 जण नको त्या अवस्थेत सापडले

लोणावळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणावळ्यात असलेल्या विस्प्रिरिंग वुड या हॉटेलवर कारवाई केली आहे.

लोणावळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणावळ्यात असलेल्या विस्प्रिरिंग वुड या हॉटेलवर कारवाई केली आहे.

लोणावळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणावळ्यात असलेल्या विस्प्रिरिंग वुड या हॉटेलवर कारवाई केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

गणेश दुडम, (मावळ/ लोणावळा) : लोणावळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. लोणावळ्यात असलेल्या विस्प्रिरिंग वुड या हॉटेलवर कारवाई केली आहे. या अलिशान हॉटेलमध्ये अश्लिल गाण्यांवर नृत्य करणाऱ्या महिलांसह काही पुरूषांना पकडत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या कारवाईमध्ये थेट आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांनी लक्ष घालत ही धाड टाकली आहे. याप्रकारणी लोणावळा शहर पोलिसांनी 53 जणांवर कारवाई केली आहे.

हे ही वाचा :  Viral : 'या' चोराला कुठे शोधायचं पोलिसांना प्रश्न ? CCTV मध्ये चोर तर दिसला पण...

लोणावळ्यातील विस्प्रिरिंग वुड या आलिशान हाॅटेलात अश्लील गाण्यावर नृत्य करणार्‍या नऊ महिला नर्तकी आणि चव्वेचाळीस शौकीन पुरुष असे त्रेपन्न जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी वलवण गावातील या हाॅटेलमध्ये धाड टाकली असता अश्लील नृत्य करून साऊंड सिस्टीम मोठया आवाजात वाजवत हा नाच सुरू होता.या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वलवण गावातील विस्प्रिरिंग वुड या हाॅटेल मध्ये काही इसम व महिला असे अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करून साऊंड सिस्टीम मोठया आवाजात वाजवून विवस्त्र चाळे करून गाण्याचे तालावर नाचत आहेत.

अशी माहिती मिळाल्याने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह व लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे कडील पोलीस स्टाफ यांनी सदर हॉटेल मध्ये अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी एकुण 44 पुरुष व 9 महिला असे हॉटेलच्या प्रांगणात अश्लील गाण्यावर अश्लील नृत्य करुन विवस्त्र चाळे करुन नियम व तरतुदीचे उल्लंघन करत असताना मिळून आले आहेत.

याप्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात 53 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा : तरुणीने आखला स्वत:च्याच हत्येचा कट, कारण समोर येताच पोलिसांनाही बसला धक्का

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 53 जणांवर आयपीसी 294, 34 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Pune, Pune (City/Town/Village), Pune crime, Pune police