पुणे, 24 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये (corona lockdown आपली ड्युटी बजावताना पोलीस माणुसकीही जपताना दिसत आहे. लोकांच्या सुखदुखात सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत कुणी एकटं पडणार नाही याची काळजी घेत आहे. कुठे एखाद्यावर अंत्यसंस्कार करत आहेत, तर कुठे कुणाचा वाढदिवस साजरा करत आहेत आणि आता तर एका तरुणीच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठीही एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे.
पुणे पोलिसांनी (pune police) एका तरुणीला Engagement चं स्पेशल असं गिफ्ट दिलं आहे. स्नेहा कटारिया असं या तरुणीचं नाव आहे. स्नेहाची Engagement आहे आणि त्यासाठी तिला मुंबईला जायचं आहे. तिनं ट्विटवर पुणे पोलिसांकडून मुंबईला जाण्याची परवानगी मागितली.
स्नेहाने पोलिसांना ट्वीट केलं की, माझी Engagement आहे. आपल्याला मुंबईला जायचं आहे. 28 जुलैला आपल्याला मुंबईला जाण्याची परवानगी द्या. यासह तिनं आपला टोकन नंबर आणि मोबाइल नंबरही दिला. पुणे पोलिसांनी स्नेहाला तात्काळ परवानगी दिली. त्यांनी तिचा ई-पास मंजूर केला आणि तिला एन्गेजमेंटसाठी शुभेच्छाही दिल्या.
Ma'am your e-pass is approved and congratulations in advance on the engagement. :)
— PUNE POLICE (@PuneCityPolice) July 24, 2020
स्नेहासाठी हा ई-पास म्हणजे पुणे पोलिसांनी दिलेलं एक Engagement गिफ्टचं आहे. परवानगी मिळताच तिला खूप आनंद झाला आणि तिने पुणे पोलिसांचे आभारही मानले.
हे वाचा - याला म्हणतात खाकी वर्दी! चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत
पुण्यात कोरोनाचा कहर कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार होता. मात्र शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत आधीचेच नियम आहे तसेच राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तर पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.
हे वाचा - हॅप्पी क्लब' नातं रक्ताच्या पलिकडचं! मुस्लिम तरुण करत आहे 'हे' पुण्याचं काम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत झपाट्यानं वाढ झाली. परिणामी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात, हे दिसून आला. त्यामुळे बाजारपेठ आणि लग्न समारंभाबाबत प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि त्यात गटारी अमावस्येमुळे पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.