याला म्हणतात खाकी वर्दी! रस्त्यावर चहा विकणाऱ्या मुलाला मुंबई पोलिसानं केली मोठी मदत

चहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता मुलाचं उत्तर ऐकून पोलीस कर्मचाऱ्याच्या काळजाचं पाणी झालं.

चहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता मुलाचं उत्तर ऐकून पोलीस कर्मचाऱ्याच्या काळजाचं पाणी झालं.

  • Share this:
    मुंबई, 24 जुलै : राज्यात सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मोठं संकट ओढावलं आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था पणाला लागली आहे. पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता मुंबई विभागात लॉकडाऊनदरम्यान काम करत आहेत. राज्य संकटात असताना जीवापाड काम करणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. अशात देवासारख्या काम करणाऱ्या पोलिसांच्या अनेक कौतूकास्पद बातम्या समोर आल्या आहेत. असाच एक प्रकार मुंबईत वरळी विभागात घडला आहे. वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ओंकार व्हनमारे या कर्मचाऱ्याने चहा विकणाऱ्या एका मुलाला शिक्षणासाठी वह्या-पुस्तकं घेण्यासाठी मदत केली आहे. माटुंगा (दादर) परिसरात बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ओंकार यांना चहा विकणाऱ्या सागर माने या शाळकरी मुलाची ओळख झाली. त्याची समस्या जाणून घेत ओंकार यांनी त्याला मदत केली आणि शिक्षणासाठी मोठं प्रोस्ताहन दिलं. आज माटुंगा (दादर) इथं बंदोबस्त करत असताना एक 14 वर्षाचा मुलगा आला आणि ओंकार यांना विचारलं ,"साहेब चहा घेणार का ?" त्यानंतर त्यांना सहज विचारलं, "बाळा नाव काय तुझं?" "सागर माने" असं नाव त्याने सांगितलं. चहा का विकतोस असा प्रश्न विचारला असता, 29 मार्चला वडील वारले. त्यांचं चहाचं कॅन्टीन होतं, आतापर्यंत जितकं कमवलं होतं तितकं सगळ संपलं. घरात आई आणि मी राहतो. आई आजारी असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो आणि रोज 200 रुपये मिळवतो. कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तक घ्यायला पैसे नाहीत, घर भाडं द्यायचं आहे असं त्याने ओंकार यांना सांगितलं. महालक्ष्मी मंदिरासमोर तरुणावर सत्तूराने केले 16 वार, भर दिवसा वाहिला रक्ताचा पाठ यावर ओंकार यांनी "तुला पुढे शिकायचं आहे का?" असा प्रश्न विचारताच "मला तुमच्या सारखं पोलीस व्हायचं आहे" असं त्याने उत्तरं दिलं. त्यावेळेस कोणताही विचार न करता ओंकार यांनी आई वडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केले त्या प्रकारे त्याला 10वीची पुस्तकं आणि वह्या घेऊन दिल्या. इतकंच नाही तर अभ्यासाठी पुढे कोणतीही अडचण आली की मदतीसाठी कायम फोन कर असंही ओंकार यांनी सांगितलं. ओंकार यांच्या या कामगिरीमुळे त्यांचं सर्वस्तरातून कौतूक होतं आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published: