Home /News /maharashtra /

'हॅप्पी क्लब' नातं रक्ताच्या पलिकडचं! नांदेडमध्ये मुस्लिम तरुण करत आहे 'हे' पुण्याचं काम

'हॅप्पी क्लब' नातं रक्ताच्या पलिकडचं! नांदेडमध्ये मुस्लिम तरुण करत आहे 'हे' पुण्याचं काम

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. पण नांदेडमध्ये हॅप्पी क्लब नावाच्या एका सामाजिक संस्था आहे.

नांदेड, 24 जुलै: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. पण नांदेडमध्ये हॅप्पी क्लब नावाच्या एका सामाजिक संस्था आहे. या संस्थेने स्वत: पुढाकार घेत कोरोनामुळे मरण पावलेल्या नागरिकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचं पुण्याचं काम सुरू केलं आहे. या संस्थेतील 20 मुस्लिम तरुण ही जबाबदारी पार पाडत आहेत. हेही वाचा...खुलेआम काळाबाजार! 1500 रुपये द्या आणि अवघ्या 15 मिनिटांत मिळवा ई-पास नांदेड जिल्ह्यातही कोरोनानं कहर केला. एप्रिल महिन्यात नांदेडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. पहिलाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचारादरम्यान दगावला. तेव्हा मयताच्या मोजक्या नातेवाईकाच्या मदतीने महापालिकेने त्या मयतावर अंत्यसंस्कार केले. त्याच दिवशी हॅप्पी क्लब नावाच्या सामाजिक संस्थेने स्वत: हून महापालिका अधिकऱ्याशी संपर्क साधून कोरोनामुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली. कोणताही मोबदला न घेता सेवा म्हणून अंत्यसंस्कार करण्याची परवानगी हॅप्पी क्लबला देण्यात आली आहे, अशी माहिती नांदेड महापालिका उपायुक्त सौरभ कैतमवार यांनी दिली. हॅप्पी क्लब या संस्थेत सर्व मुस्लिम युवक कार्यरत आहेत. एकूण 20 तरुण गेल्या चार महिन्यांपासून सर्व धर्मातील मयतावर अंत्यसंस्कार करत आहेत. हिंदू मयत असेल फक्त विधी आणि भडाग्नी देण्यासाठी नातेवाईकाला बोलावले जाते. अनेक वेळा नातेवाईक देखील पॉझिटिव्ह असल्याने असल्याने किंवा क्वारंटाईन असल्याने ते अंत्यविधीला येऊ शकत नाहीत. तेव्हा त्या-त्या धर्मातील महापालिकेचा कर्मचारी चितेला अग्नी देतो. मुस्लिम मयत असेल तर हेच तरुण नातेकाईकाशिवाय 'नमाझ ए जनाझा' पडून दफनविधी करण्यात येतो, असं हॅप्पी क्लबचे अध्यक्ष महोमद शोयेब यांनी सांगितलं. महापालिकेकडून यांना पीपीइ किट दिली जाते. बाकी रुग्णालयातून मृतदेह आणण्यापासून ते सर्व कामे हेच तरुण करतात. या कामासाठी त्यांना अनेकांनी विरोध केला. पण कुटुंबाने प्रोत्साहन दिल्याने हे तरुण जोमाने कामाला लागले आहेत. हेही वाचा...स्वेच्छा निवृत्तीच्या निर्णयाविरोधात एसटी कामगार संघटनांचा एल्गार, कोर्टात जाणार नांदेडमध्ये अनोळखी मृतदेहावर हीच संस्था पूर्वीपासून अंत्यसंस्कार करते. त्यामुळे मृताबद्दलची भीती या तरुणांना वाटत नाही. पण कोरोना हा विषय वेगळा आहे. येथे संसर्ग होण्याची शक्यता आहे. तरी देखील हे तरुण धोका पत्करून कुठलाही मोबदला न घेता पार्थिवावर अंत्यसंस्कार करतात. दरम्यान, गेल्या चार महिन्यांत कोरोनामुळे नांदेड शहरात 57 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 55 जणांवर हॅप्पी क्लबने अंत्यसंस्कार केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Nanded

पुढील बातम्या