पुणेकरांसाठी चिंतेची बाब! 60+ वय असेल तर सावधान, धक्कादायक रिपोर्ट आला समोर

पुणेकरांसाठी चिंतेची बाब! 60+ वय असेल तर सावधान, धक्कादायक रिपोर्ट आला समोर

नुकत्याच एक सर्व्हेमधून पुण्यातील 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या 922 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

पुणे, 28 ऑगस्ट : पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात सध्या 28 हजार 142 एकूण कोरोना रुग्ण आहेत. तर, 872 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र नुकत्याच एक सर्व्हेमधून पुण्यातील 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या 922 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा सर्व्हे पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने करण्यात आला होता.

या सर्व्हेअंतर्गत पुण्यातील एकूण 2.46 लाख पुण्यातील तर 3500 पिंपरी चिंचवडमधील लोकांची तपासणी करण्याती आली. यात 922 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, ज्यांचे वय 60 आणि त्याहून अधिक होते. या सर्व्हेमुळे शहरातील अति धोकादायक, कमी धोकादायक अशा रुग्णांची विभागणी करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले.

वाचा-कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणं नसलेल्यांनी वाढवली चिंता

पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत, "आम्ही एक अॅप तयार केले आहे. ज्याचे नाव आहे वयश्री. यात अॅपमध्ये वयस्कर व्यक्तींची माहिती साठवली जात आहे. याआधी प्रत्येक घराघरात जाऊन सर्व्हे करावा लागत होता. आता या अॅपच्या माध्यमातून सहज माहिती उपलब्ध होत आहे. सर्व्हेनंतर जास्त कोरोना रुग्ण असलेल्या परिसरांत नोडल ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले आहे", असे सांगितले. तर, पिंपरी चिंचवडमधीलही 2 लाख वयस्कर व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

वाचा-कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम

दरम्यान, या सर्व्हेतून 60 आणि त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडा आणि बाहेर पडल्यास मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं लोकांना करण्यात आले आहे.

वाचा-142 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण

राज्यात रुग्णांची संख्या वाढतीच

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ कायम आहे. सलग गेले काही दिवस राज्यात दररोज 14 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारीही 14 हजार 718 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 7 लाख 33 हजार 500 एवढी झाली आहे. तर 355 जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी 9136 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात 1 लाख 78 हजार जण करोनावर उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 72.36 टक्के एवढं झालं आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 28, 2020, 9:20 AM IST

ताज्या बातम्या