जिनिव्हा, 28 ऑगस्ट : जगभरात सध्या 2 कोटी 42 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 8 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले पण लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण होऊ शकते, अशी शक्यता जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) व्यक्त केली आहे. WHOच्या मते अशा लोकांमध्ये लगेच लक्षणं दिसत नाहीत मात्र त्यांची चाचणी करणे गरजेचे आहे. WHO असे मत व्यक्त केले जेव्हा, अमेरिकन रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांनी (CDC) म्हटले आहे की कोव्हिड-19च्या संपर्कात आलेल्या मात्र लक्षणे नसलेल्या लोकांची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर WHO अशा व्यक्तींमध्ये उशीरा लक्षणं दिसण्याची शक्यता असते, असे सांगितले. , WHOचे अॅपिडेमिओलॉजिस्ट मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले की, यूएन एजन्सीने संशयित प्रकरणांची आणि त्यांच्या संपर्कांची शक्य असल्यास चाचणी करण्याची शिफारस केली आहे, मात्र संसर्ग होण्याची चिन्हे दर्शविणार्या लोकांवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाचा- कीटकनाशकही करू शकतो कोरोनाव्हायरसचा नाश; संशोधनात दिसून आला सकारात्मक परिणाम तर, WHOचे आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माईक रायन म्हणाले की रोगप्रतिकारक (asymptomatic) किंवा पूर्व-रोगसूचक (pre-symptomatic ) लोकांची चाचणी करण्याचा एक तर्क आहे, जास्त लोकसंख्या असल्यास चाचणी करणे महाग पडू शकते. यामुळे योग्य व्यक्तींच्या चाचणीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, क्लस्टर्समधील चाचणी जास्तीत जास्त करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असेही रायन म्हणाले. वाचा- 142 दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस अॅडॅनॉम गेब्रेयसिस म्हणाले की, व्हायरसच्या उत्पत्तीची तपासणी करण्यासाठी एजन्सी चीनमध्ये जाण्यासाठी आयोजित करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय मिशन वुहान येथे जाईल, जिथे गेल्या वर्षी सर्वात आधी संसर्ग झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







