Home /News /coronavirus-latest-news /

142 दिवसांनंतर पुन्हा झाली कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण

142 दिवसांनंतर पुन्हा झाली कोरोनाची लागण; धक्कादायक कारणं आली समोर, संशोधकही हैराण

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात अॅंटीबॉडीज तयार झाल्यामुळे त्याला पुन्हा लागण होण्याची शक्यता कमी असते. कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून विषाणूची लक्षणं, परिणामांमध्ये वारंवार बदल होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे

पुढे वाचा ...
    हाँगकाँग, 27 ऑगस्ट : कोरोना व्हायरस (Corona Virus) विरोधात देशभरात जोरदार लढाई सुरू आहे. अनेक देशांनामध्ये कोरोनाची औषधं आणि लशीचे ट्रायल (Trails) शेवटच्या टप्प्यात आहे. याचा प्रसार रोखण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान हाँगकाँगमधील (Hong Kong) एका रिपोर्टमुळे कोरोना व्हायरसच्या जगभरात फैलाव (spreading) होण्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. हाँगकाँगमध्ये 142 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या (Corona Positve) व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण (Infected) झाल्याची माहिती समोर आली आहे. याच्या तपासात अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. कोणाचा आहे हा रिपोर्ट या आठवड्याच्या सुरुवातील हाँगकाँग विद्यापीठाचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता, ज्यामध्ये जगातील पहिल्यांदा दुसऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. 33 वर्षीय हा व्यक्ती मार्चमध्ये पहिल्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्यानंतर 142 दिवसांनंतर पुन्हा त्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा रुग्ण मार्चमध्ये तब्येत बरी झाल्यानंतर यूकेतून स्पेन गेला होता आणि पुन्हा जेव्हा तो हाँगकाँगमध्ये आल्यानंतर त्याची पुन्हा चाचणी झाली तेव्हा तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. संशोधनकर्त्यांनी या व्यक्तीला दुसऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे. यासह या व्यक्तीला कोरोना व्हायरस शेडिंग आहे की त्याला पुन्हा संसर्ग झाला आहे याचा तपास करीत आहेत. पहिल्यावेळी झालेल्या संसर्गानंतर त्याच्या शरीरात अॅन्टीबॉडीज नव्हती, तर दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर अॅन्टीबॉजीड रुग्णालयात गेल्यानंतर 5 दिवसांनंतर दिसून आली. मात्र त्यापूर्वी पहिल्या संसर्गानंतर सीरम सॅम्पची चाचणी झाली नव्हती. यामागे व्हायरल शेडिंग आहे का याचा तपास केला जात आहे. व्हायरल शेडिंगमध्ये शरीरात व्हायरस तयार झाल्यानंतर शरीर व्हायरस बाहेर फेकू लागतो. हे शरीरात व्हायरस तयार होण्याची प्रक्रिया संपल्यानंतरही सुरू राहते.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या