पिंपरी-चिंचवड, 20 मे: कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पिंपरीचिंचवडमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात आज (बुधवारी) नागरिकांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. किराणा मालाची दुकाने सुरू ठेवावीत तसेच आम्हाला महापालिकेने अन्नधान्य पुरवावे, या मागणीसाठी शेकडो महिला- पुरुष रस्त्यावर उतरले.
दरम्यान, चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर झोपडपट्टीत 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर महापालिकेने सील केला आहे. मात्र, दुकाने बंद असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत शेकडो नागरिक उतरले. यावेळी काही जणांनी हुल्लडबाजीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इतर नागरिकांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा...करुन दाखवलं! होम क्वारंटाईनसाठी शिवसेना खासदारांनी दिलं चक्क स्वतःचं घर
मिळालेली माहिती अशी की, आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना अन्नधान्य, जेवण मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. चिंचवड पोलिसांनी महापालिकेतर्फे जेवणाची सोय केली जाईल, असे सांगत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.
चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. या ठिकाणी रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे.आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. यामुळे हा परिसर सील केला आहे. परंतु, सगळेच बंद असल्याने झोपडपट्टीतील महिलांना अन्नधान्य मिळेना, उपाशी रहावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यानंतर चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आनंदनगरमधील सगळी किराणा, रेशनची दुकान चालू राहतील. सर्वांची जेवणाची व्यवस्था केली जाईल. महापालिकेकडून घरपोच जेवन दिले जाणार आहे. बाकी सगळ्यांनी घरी निघून जावे. केवळ पाच महिला थांबा, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यानंतर गर्दी कमी झाली.
हेही वाचा..आदित्य ठाकरे आणि भाजप नेत्यात जुंपली, राष्ट्रीय वाद पोचला वैयक्तीक पातळीवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.