पिंपरी चिंचवड, 27 मे: पुणे जिल्ह्यात खेड तालुका पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) सभापती पदाचा वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे (Shivsena) विद्यमान सभापती भगवान पोखरकर (Bhagwan Pokharkar) यांनी महिला आणि पुरुष सदस्यांवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पुण्यातील (Pune) एका हॉटेलमध्ये (Hotel) ही घटना घडली. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
(वाचा-पिंपरी चिंचवड पोलिसांचा दणका, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक)
खेड पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरून हा वाद झालाय. भगवान पोखरकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला होता. तरीही ते इतर सदस्यांना संधी देत नव्हते म्हणून समितीच्या सदस्य असलेल्या सविता सांडभोर यांनी इतर सहा सदस्यांसह मिळून पोखरकर यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला. ठरावावर 31 तारखेला मतदान होणार होतं. त्यामुळं ठराव मांडणारे सर्व सदस्य हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. पोखरकर यांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी रात्री भाऊ आणि कार्यकर्त्यांसह जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सांडभोर आणि इतर सदस्यांनी केलाय आहे. तसंच दोन सदस्यांना शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्ती घेऊन गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
(वाचा-कोरोनाच्यानिमित्ताने भाजपची निवडणुकीची तयारी? पुण्यात भाजप 'मिशन लसीकरणा'ला जोर)
दरम्यान, अविश्वास ठराव दाखल असला तरी बहुमत आम्हालाच मिळणार होतं. पण आमच्या बाजुनं मतदान करणाऱ्या काही सदस्यांना खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी एका हॉटेलमध्ये आमिष दाखवून डांबून ठेवल्याची माहिती मला सदस्यांकडूनच मिळाली. एका सदस्यांच्या पत्नीने अशी तक्रारही पोलिसांकडे दाखल केलेली आहे. त्यामुळं आम्ही त्यांना सोडवायला गेलो मात्र तिथं गेल्यावर माझ्यावरच हल्ला करण्यात आल्याच पोखरकर यांचं म्हणणं आहे.
सध्या या प्रकरणामुळं खेडमधील राजकीय वातावरण तापलं आहे. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर आता खेड तालुका पंचायत समिती सभापती पदासाठी 31 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसंदर्भात पुणे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune crime, Pune news