पिंपरी चिंचवड, 27 मे : दोन खुनी हल्ले केल्या प्रकरणी फरार असलेलेल्या पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे (NCP MLA Anna Bansode) यांच्या पुत्राला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली आहे. सिद्धार्थ बनसोडे (Sidharth bansode) असं अटकेत असलेल्या आरोपीचं नाव असून आज त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
सिद्धार्थ हा पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलगा आहे. 13 मे रोजी त्याच्या विरुद्ध पिंपरीतील AG इन्व्हायरो इन्फ्रा या कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी तसेच आमदाराला बोलण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जबर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
IPL 2022: 'मेगा ऑक्शनमध्ये असेल धोनीचं नाव', 'या' क्रिकेटपटूचा दावा
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटनाही याच दरम्यान घडली होती. आपली दोन माणसं कामावर घेण्यावरून आमदार बनसोडे यांचं AG एन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर तानाजी पवार यांच्यासोबत बोलणं सुरू होतं. मात्र, बोलण्याचं रूपांतर वादात झालं तेव्हा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थ याने तानाजी पवार याला शोधण्यासाठी कंपनीत दाखल झाला.
VIDEO: आमदार बनसोडेंवर गोळीबार प्रकरणात, एक दिवसापूर्वीचं CCTV फूटेज होतय व्हायरल pic.twitter.com/zcHDW5HsNq
— News18Lokmat (@News18lokmat) May 12, 2021
मात्र, तिथे पवार न मिळाल्याने त्याने इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार कंपनीकडून दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी तानाजी पवार आमदार बनसोडे यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र तिथे दोघांमध्ये वाद झाले आणि AG इन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर असलेल्या तानाजी पवारने आमदार बनसोडेवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेदरम्यान उपस्थित असलेल्या सिद्धार्थ आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी तानाजी पवारला बेदम मारहाण केल्याची तक्रारही करण्यात आली होती.
या दोन्ही प्रकणात सिद्धार्थ व त्याच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खुनाचा प्रयत्न अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर सिद्धार्थ फरार झाला होता. मात्र अखेर बुधवारी निगडी पोलिसांनी त्याला शोधलं व आरोपी सिद्धार्थच्या चार साथीदारासह त्याला रत्नागिरीतून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त इप्पक मंचर यांनी दिली आहे.
माथेरान नगरपालिकेत शिवसेनेला मोठा धक्का, 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता आधी तक्रारीनुसार, आमदार पुत्राविरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटकही केल्याचे कृष्ण प्रकाश यांनी म्हटले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर जे दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाईही केली जाईल असही प्रकाश यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.