खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, पुणे विद्यापीठ परिसरात फेकला मृतदेह

खंडणीसाठी मित्रानेच केली मित्राची हत्या, पुणे विद्यापीठ परिसरात फेकला मृतदेह

पुण्याजवळीत भोसरीतील एका व्यापसायिकाच्या 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

गोविंद वाकडे,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड,12 जानेवारी: पुण्याजवळीत भोसरीतील एका व्यापसायिकाच्या 17 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अब्दुल आहाद सय्यद सिद्दीकी असे मृत मुलाचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे 40 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अब्दुलचे त्या मित्रानेच अपहरण करून त्याची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

अब्दुल दापोडी येथील रहिवासी होता. पुणे विद्यापीठ परिसरात रविवारी पहादे अब्दुलचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुलचा मित्र उमर शेख यानेच त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.

युक्रेन विमान अपघात : केस कापायला गेलेल्या ब्रिटनच्या राजदूताला इराणने तिथूनच उचललं

मिळालेली माहिती अशी की, अब्दुल ही शनिवारपासून बेपत्ता होता. अब्दुलच्या नातेवाईकांना त्याच शोध घेतला असता रविवारी पहाटे पुणे विद्यापीठ परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. 40 लाख रुपयांची खंडणी न दिल्याने उमर शेख याने अब्दुलचे अपहरण करून त्याची हत्या केली, असा आरोप अब्दुलच्या नातेवाईकांनी केली आहे.

बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचा टिपला अश्लिल व्हिडिओ, 'कूक' अटकेत

अब्दुल आणि उमर हे दोघे शनिवारी पाच वाजेच्या सुमारास पार्टीसाठी गेले होते. मात्र, अब्दुल याचे रात्री आठच्या सुमारास अज्ञातांनी अपहरण केले. दरम्यान आरोपींनी फोनवर 40 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलीस आरोपींचा माग काढत असताना अब्दुल आहाद याचा मृतदेह रविवारी पहाटे चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात आढळून आला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अब्दुलचा मित्र उमर शेख याला ताब्यात घेऊन पुढील चोकशी सुरू असल्याची माहिती अवताडे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2020 10:43 AM IST

ताज्या बातम्या