मुंबई,12 जानेवारी: बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचा मोबाइल फोनमध्ये अश्लिल व्हिडिओ टिपणाऱ्या एका भामट्याला पोलिसांना अटक केली आहे. आरोपी आणि पीडित महिला पवईतील एका बिझनेसमनच्या फ्लॅटमध्ये नोकरी करतात. आरोपी हा स्वयंपाकीचे काम करतो. ही घटना 5 जानेवारीची आहे. बाथरूममध्ये अंघोळ करत असताना पीडित महिलेला खिडकीत एक मोबाइल फोन दिसला. याबाबत तिने आपल्या मालकाला माहिती दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पवई पोलिसांनी 22 वर्षीय एका स्वयंपाकीला अटक केली आहे. पीडित महिला अंघोळ करत असताना आरोपीने खिडकीत मोबाइल फोन ठेऊन त्यात अश्लिल चित्रण केले. महिलेला संशय येताच तिने मालकाला सगळा प्रकार सांगितला. यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पीडित महिला आणि आरोपी गेल्या काही दिवसांपासून बिझनेसमनकडे काम करत होते. दोघे बंगल्यातच राहत होते. पोलिसांना सांगितले की, आरोपीकडून मोबाइल जब्त करण्यात आला आहे. मोबाइलमधील डेटा रिकव्हर झाल्यानंतर आरोपीचे कारनामे समोर येतील. आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लेकीवर सगळ्यात जास्त माया करणाऱ्या बापानेच केला बलात्कार कोल्हापूरमध्ये महिला अत्याचाराचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बापानेच पोटच्या लेकीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. अवघ्या 7 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच वडिलांकडून बलात्कार करण्यात आला आहे. पत्नीच्या सतर्कतेमुळे हा गंभीर प्रकार उघड झाला आहे. पत्नीकडून नराधम पतीविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून वारंवार महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यात जर मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच असा प्रकार केला तर मुली घरातही सुरक्षित नाही असं म्हणावं लागेल. घरातील वडिलच जर लेकीवर असा अत्याचार करत असेल तर मुलींनी कुठे जावं हा मोठा प्रश्न आहे. या सगळ्यामुळे संतप्त नागरिकांनी नराधमाला बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.