Home /News /pune /

पुण्यात भाजप सरपंचाने केला भयंकर घोटाळा, संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यात भाजप सरपंचाने केला भयंकर घोटाळा, संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजप सरपंचावर एक नाही तर याआधीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

पुणे, 28 ऑगस्ट : पुण्यात भाजप सरपंचावर भयंकर गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजप सरपंचावर एक नाही तर याआधीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. शिरूर तालुक्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या टाकळी भीमा गावचा सरपंच आणि शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र दोरगे याच्यासह त्याची पत्नी आणि वडिलांवर जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे रवींद्र दोरगे याच्याविरोधात फसवणुक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा करण्यात आला आहे. रवींद्र दोरगेवर यापूर्वीदेखील फसवणूक आणि आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अनेक बँकांचे कर्जदेखील थकवल्याबाबत नोटीस प्रसिद्ध झालेल्या आहेत. यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सरपंच रवींद्र दोरगे हा फरार होता. मात्र, वारंवार गुन्हे दाखल होऊन देखील शिक्रापूर पोलिसांना दोरगे याला अटक करण्यात यश आलं नाही. अवघं महाबळेश्वर निघाला होता विकायला, पोलिसांनी असा उधळला सगळ्यात मोठा कट यामुळे आता तरी पोलीस रवींद्र दोरगे याला अटक करणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागलेलं आहे. तर शिरूर तालुक्यातील सरपंचावर फसवणुक आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये रवींद्र याने तळेगाव ढमढेरे इथल्या दीपक आल्हाट व्यक्तीची जमीन विकत घेऊन जमीन खरेदी करताना दिलेले चेक बाउन्स झाले. पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार यानंतर जमिनीच्या मूळ मालकांनी वारंवार पैशाची मागणी केली असता त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावेळी रवींद्र याने चक्क ती जमीन दुसऱ्याला विकून टाकली. मात्र, जमिनीचे मूळ मालकाने टाकळी भिमा इथं जाऊन रवींद्र याच्याकडे पैशांची मागणी केली असता त्याने जातिवाचक शिवीगाळ केली. 'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप यावेळी रवींद्रचे वडील बाळासाहेब दोरगे आणि पत्नी यांनी देखील जमिनीच्या मूळ मालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. त्याबाबत जमिनीचे मूळ मालक दीपक आल्हाट यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन इथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी सरपंच रवींद्र दोरगे याच्यासह त्याच्या पत्नी आणि वडिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Narendra modi, Pune, Pune news

पुढील बातम्या