पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार

पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार

वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 4 जण जणांचा जीव गेला आहे.

  • Share this:

जुन्नर, 28 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशात पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 4 जण जणांचा जीव गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दांगटमळ्याजवळ आज पहाटे टाटाच्या जितो आणि आयशर ट्रकमध्ये सामोरा-समोर धडक झाली. यासंबंधीची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

अपघातात टाटा कंपनीच्या जितो या 3 चाकीचं मोठं नुकसान झालं आहे. सदरची जितो टेम्पो क्रमांक MH 16 CC 6388 मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता तर आयशर टेम्पो MH 16 AE 9080 आळेफाटा बाजुकडून कल्याण दिशेने चालला होता. मृतांमधील 4 जण जितोमधील असून दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यु झाला आहे तर एकाचा आळेफाटा इथल्या रुग्णालयात तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

'महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले', तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप

मृतांमधे जितोच्या चालक व वाहकासह अन्य दोघांचा समावेश आहे. तर आयशरचा चालक किरकोळ जखमी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

6 कोटींसाठी मुंबईकरांचा जीव घातला धोक्यात, अग्निशमन दलातील 121 महत्वाची पदं रद्द

दरम्यान, पोलिसांनी 4 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मृतांची माहिती देण्यात आली असून चारही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 28, 2020, 9:01 AM IST

ताज्या बातम्या