जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अवघं महाबळेश्वर निघाला होता विकायला, पोलिसांनी असा उधळला सगळ्यात मोठा कट

अवघं महाबळेश्वर निघाला होता विकायला, पोलिसांनी असा उधळला सगळ्यात मोठा कट

अवघं महाबळेश्वर निघाला होता विकायला, पोलिसांनी असा उधळला सगळ्यात मोठा कट

आपण नेहमीच जमीन व्यवहाराच्या बाबतीत फसवणुकीच्या घटना पहात आलो आहोत. त्या पण घटना या 1-2 गुंठ्याच्या किंवा काही एकरातल्या असतील. पण 1-2 एकर सोडा अवघं महाबळेश्वर विकण्याचा कट उकडकीस आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

किरण मोहित, प्रतिनिधी महाबळेश्वर, 28 ऑगस्ट : राज्यात अख्खं महाबळेश्वर विकण्याचा कट सुरू होता असं जर तुम्हाला कळलं तर त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. कारण, आपण नेहमीच जमीन व्यवहाराच्या बाबतीत फसवणुकीच्या घटना पहात आलो आहोत. त्या पण घटना या 1-2 गुंठ्याच्या किंवा काही एकरातल्या असतील. पण 1-2 एकर सोडा अवघं महाबळेश्वर विकण्याचा कट उकडकीस आला आहे. एका व्यक्तीने चक्क महाबळेश्वर एवढी जमीन विकायला काढली होती. त्याकरिता त्यांनी वैभव गिरी या पुण्यातील वारजे इथे सध्या राहत असलेल्या व्यक्तीशी संपर्क केला. ज्यांचं महाबळेश्वर इथे कामानिमित्त येणं-जाणं होतं. ही जमीन नावे करून देतो असे सांगून साताऱ्यातील एका नामांकित वकिलाने आणि त्याच्या मित्राने त्यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. पुणेकरांनो सावधान! मास्क न वापरणाऱ्यांसाठी अजित पवार घेणार मोठा निर्णय ऍड. रविराज जोशी आणि सुहास वाकडे अशी या फसवणूक करणारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात आता महाबळेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाबळेश्वर, लिंगमळा, प्रतापगड, वेण्णा लेक, आर्थरसीट पॉईंट या परिसरात दिवंगत दत्तो पिंगळे यांची इमान 3 च्या सनदेने देवस्थान जमीन आहे. पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक, अपघातात 4 जण ठार ज्या जमिनीचे क्षेत्र हे एकूण 4875 एकर आणि 25 आर इतकी आहे. ही जमीन या दोन अवलीयांनी विकण्याचा प्रयत्न केला आहे. महाबळेश्वर आणि परिसरातील जमिनीवर कायमच धनदांडग्यांचा डोळा राहिला आहे. या अगोदरही अनेकदा इथे अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, महाबळेश्वर एवढी पूर्ण जमीनच विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महाभागांमुळे महाबळेश्वर हादरून गेले आहे. ‘महिलांना माझ्याकडे पाठवून कपडे फाडून घेतले’, तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप या संपूर्ण घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून या व्यवहारासाठी तयार करण्यात आलेली सगळी कागदपत्र पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यावर चौकशी सुरू असून यात आणखी कोणाचा हात होता का? याचाही पोलीस शोध घेत असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात