रुग्णांचा लूट! कोरोनाच्या महामारीत पुण्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

रुग्णांचा लूट! कोरोनाच्या महामारीत पुण्यात उघडकीस आला धक्कादायक प्रकार

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल 8 हजार रुपये भाडे आकारले आहे.

  • Share this:

पुणे, 10 जुलै: कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांसह रुग्णवाहिकेवर अधिक ताण येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. यादरम्यान बऱ्याचदा रुग्णवाहिकाने मालकांकडून जास्तीचे पैसे आकारल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

हेही वाचा...धक्कादायक! पुण्यात Whatsapp स्टेटस ठेवून इंजिनियर तरुणानं संपवलं आयुष्य

पुण्यात कोरोनाबाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेने तब्बल 8 हजार रुपये भाडे आकारले आहे. 7 किमी अंतरासाठी नियमाप्रमाणे 900 रुपये भाडे अपेक्षित असताना रुग्णाकडून तब्बल 8 हजार रुपये भाडे आकारल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने या विरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मूळात ही रुग्णवाहिका नसून मोबाइल व्हॅन आहे आणि रुग्णाला ने-आण करण्याची परवानगी मोबाईल व्हॅनला नाही. त्यामुळे या मोबाइल व्हॅन मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरटीओ ऑफिसनं संबंधित मोबाइल व्हॅन जप्त केली आहे.

काय आहेत रुग्णवाहिकाचे दर...

-मारुती ओम्नी: 2 तासांसाठी 500 रु आणि यापुढे11 रुपये प्रति किलोमीटर

-टाटा सुमो: 2 तासांसाठी 600 आणि यापुढे 12 रुपये प्रति किलोमीटर

-टाटा 407 स्वराज्य माझदा: 2 तासांसाठी/ 25 किलोमीटरसाठी 900 आणि यापुढे 13 रुपये प्रति किलोमीटर

रुग्णाकडून घेतले तब्बल 8 हजार रुपये...

कोरोना बाधित रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी पुण्यातील एका रुग्णवाहिकेने रुग्णाकडून तब्बल आठ हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित रुग्णवाहिका मालकाविरुद्ध बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटार वाहन निरीक्षक धनंजय गोसावी (वय 41) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

या रुग्णवाहिकेची चौकशी करत असताना आरटीओकडे या गाडीची नोंदणी मोबाईल क्लीनिक व्हॅन अशी होती. परंतु प्रत्यक्षात तिचा वापर रुग्णवाहिका म्हणून केला जात होता.

हेही वाचा...पुण्यात कुटुंबाच्या जीवाशी खेळ, चुकीचा कोरोना अहवाल देणाऱ्या प्रयोगशाळेला दणका

सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरटीओने संजीवनी ॲम्बुलन्स सर्व्हिसेस या कंपनी विरोधात तक्रार दिली त्यानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लिट्टे करीत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: July 10, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या