पुणे, 10 जुलै: व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपलोड करून 24 वर्षांच्या इंजिनियर तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. आत्महत्येपूर्वी या तरुणानं Whatsappवर स्टेटर ठेवून आयुष्य संपवण्याचे संकेत दिले होते. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मोशी परिसरात घडली आहे. अक्षयनं चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहात होता. एका खासगी कंपनीत इंजिनियर पदावर काम करत होता. बुधवारी दुपारी त्यानं इमारतीच्या टेरेसवर जाण्यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चावी मागितली मात्र सिक्युरिटीने दिली नाही. त्यानंतर दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला प्लॅट पाहायचा बहाणा केला आणि चावी घेतली. या तरुणानं 11 व्या मजल्यावरून आत्महत्या केली. हा प्लॅट एक महिन्यापासून बंद आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. हे वाचा- मुंबई - वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; भर रस्त्यात ट्रक उलटला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळचा साताऱ्याचा असलेला अक्षय पोतदार या 24 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. आई-बाबा आणि बहिणीला सांभाळा मी दुसऱ्या जगात जात आहे असं त्यानं स्टेटस अपडेट केलं आणि इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेतली. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. या तरुणाच्या मागे आई-वडील आणि त्याची बहिण आहे. अक्षयचा अचानक जाण्यानं पोतदार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.