Home /News /pune /

Pune: स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल

Pune: स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल

भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात होते त्यावेळी चापट मारली.

भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात होते त्यावेळी चापट मारली.

Pune News: स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हात उगारल्याचं समोर आलं आहे.

पुणे, 17 मे : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या पुण्यातील (Pune) कार्यक्रमात सोमवारी (16 मे 2022) जोरदार गोंधळ झाला. या कार्यकर्मात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांवर चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय आहे प्रकरण? सोमवारी बालगंधर्व रंगमंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. या दरम्यान पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तेथून बाहेर नेत होते. मात्र, त्याच दरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात सुद्धा कैद झाली आहे. या प्रकरणात आता भाजपच्या तीन कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याआधी स्मृती इराणी जे मेरेटियल हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी निघाल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. स्मृती इराणी यांना बाहेर येता आले नव्हते. पोलिसांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्या बालगंधर्व कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या. भ्याड हल्ल्याचा निषेध - सुप्रिया सुळे या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं, शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करीत असताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही. या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, NCP, Pune

पुढील बातम्या