Home /News /pune /

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर उचलला हात, VIDEO

स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर उचलला हात, VIDEO

भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात होते त्यावेळी चापट मारली.

    पुणे, 16 मे : वाढत्या महागाईचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादीने (ncp) पुण्यात भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ((smriti irani ) यांच्या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. स्मृती इराणी या (smriti irani at pune) पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. बालगंधर्व मंदिर सभागृहात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम ठरलेला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या घुसल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवले. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादींच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या महिला कार्यकर्त्यांना घेऊन जात असताना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाहीतर भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिलांना घेऊन जात होते त्यावेळी चापट मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याआधी स्मृती इराणी जे मेरेटियल हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी निघाल्या असता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. स्मृती इराणी यांना बाहेर येता आले नव्हते. पोलिसांनी जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर त्या बालगंधर्व कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या