पुण्यात मोठा गोंधळ! तब्बत तीन महिन्यांनी झालेली महापालिकेची सभा तहकूब

पुण्यात मोठा गोंधळ! तब्बत तीन महिन्यांनी झालेली महापालिकेची सभा तहकूब

विरोधी पक्षांनी कोरोनाच तारतम्य ठेवायला हवं, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना लगावला.

  • Share this:

पुणे, 17 जून: पुणे महापालिकेची मुख्यसभा बुधवारी तब्बल तीन महिन्यांनी घेण्यात आली. मुळात नगरसेवकांच पद तांत्रिक कारणानुळे रद्द होऊ नये म्हणून ही मुख्यसभा घेण्यात आली होती. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर प्रचंड गोंधळ झाला आणि सभा तहकूब करण्यात आली.

हेही वाचा... कोरोनाच्या धोक्यामुळे विमानात मिळणारी दारु आता बंद

सोशल डिस्टंसिंग पालन करून झालेल्या सभेत महाविकास आघाडीने गेल्या तीन महिन्यात कोरोनावर झालेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्तांनी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, खूप वेळ नगरसेवकांनी एकत्र बसायला नको, या सबबीखाली सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. त्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षांनी कोरोनाच तारतम्य ठेवायला हवं, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना लगावला.

दुसरीकडे, पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दणका दिला आहे. रस्ते रुंदीकरणाचा निर्णय स्थगित राज्य सरकारनं स्थगिती दिली आहे. गेल्या आठवड्यात पुणे शहरातील 323 अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर भाजपने घेतला होता. याबाबत महाविकास आघाडीच्या पालिकेतील गटनेत्यांनी, राष्ट्रवादीच्या आमदारांनी स्थगितीची मागणी केली होती. यासंदर्भात अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली. नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसह इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा...Unlock 1.0 : अवघ्या 15 दिवसात 4500 मृत्यू; या राज्यात सर्वाधिक परिणाम

महापालिकेला पाचपेक्षा अधिक रस्ते रुंद करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे स्थायी समितीत मंजूर झालेला ठराव बेकायदेशीर असल्याने स्थगिती देण्याचा निर्णय बैठकीत घेतला. आता या मुद्द्यावरून पुणे महापालिकाविरुद्ध राज्य सरकार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

First published: June 17, 2020, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading