कोरोनाच्या धोक्यामुळे विमानात मिळणारी दारु आता बंद

कोरोनाच्या धोक्यामुळे विमानात मिळणारी दारु आता बंद

अमेरिका, ब्रिटन, त्याचसोबत युरोपच्या अनेक कंपन्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत विमानातलं पेयपान बंद केलं आहे.

  • Share this:

लंडन 17 जून: कोरोनाच्या उद्रेकामुळे जगभर भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. देशोदेशीच्या विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच सोशल डिस्टन्सिंगमुळे विमानात कमी प्रवासी न्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या विमान कंपन्यांनी विमानात देण्यात येणारी दारु बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसोबत कमीत कमी संबंध यावेत यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं कारण या विमान कंपन्यांनी दिलं आहे.

अमेरिका, ब्रिटन, त्याचसोबत युरोपच्या अनेक कंपन्यांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेत विमानातलं पेयपान बंद केलं आहे. जगभर काही देशांचा अपवाद वगळता आंतरराष्ट्रीय विमानसेवा अजुनही बंद आहेत. तर देशांतर्गत सेवा मात्र सुरू करण्यात आलेली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसची प्रकरणे वाढून 82 लाखांहून अधिक झाली आहे, तर 4 लाख 45 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. देशातील सर्व देशांना फेस मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम बंधनकारक केले आहे. आता एक संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

अखेर कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारं पहिलं औषध सापडलं! WHOनं दिली माहिती

मास्क लावल्यानंतर कोरोना इन्फेक्शनचा धोका असतो. संशोधनानुसार जर तुम्ही संक्रमिक व्यक्तीपासून 3 फूटापेक्षा कमी अंतरावर आहात आणि मास्क घातला असेल तर तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक होते. ही बाब संशोधनातून उघड झाली आहे. सायप्रसच्या निकोसिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणू  मास्क घालून आणि 3 फूटाचं सोशल डिस्टन्सिंग करुनही शरीरात प्रवेश करू शकतो.

कोरोनाचा आता माशांनाही धोका, समुद्रात जमा होतोय मास्क आणि PPE किटचा कचरा

संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोना संक्रमित व्यक्तीला सतत खोकला असेल तर मास्क घालण्यात काही अर्थ नाही. मास्क घातले असूनही सुमारे 6 फूट अंतर आवश्यक आहे, असा इशारा विद्यापीठाच्या वैज्ञानिक तालिब बाक आणि दिमित्रीस डिकाकिस यांनी दिला आहे.

 

 

First published: June 17, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या