Unlock 1.0 : अवघ्या 15 दिवसात 4500 मृत्यू; महाराष्ट्र नव्हे या राज्यात सर्वाधिक परिणाम

Unlock 1.0 : अवघ्या 15 दिवसात 4500 मृत्यू; महाराष्ट्र नव्हे या राज्यात सर्वाधिक परिणाम

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 8 जूननंतर मृत्यूचे प्रमाण संसर्ग दरापेक्षा जास्त वाढले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे । कडाऊन सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 9915 लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 8 जूननंतर मृत्यूचे प्रमाण संसर्ग दरापेक्षा जास्त वाढले आहे. संसर्गाचे प्रमाण 1.29 टक्के वाढले आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांनी वाढले आहे. भारतातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 80 टक्के मृत्यू पाच राज्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत. ही राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात आहेत. त्याचप्रमाणे भारतात असे 65 जिल्हे आहेत ज्यात मृत्यूचे प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, गुजरातचे 11, उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 10 आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हा प्रभावित झाले आहेत.

गुजरातची परिस्थिती गंभीर

सध्या भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गुजरातमध्ये सर्वाधिक आहे. गुजरात राज्याचा कोरोना मृत्यू दर 6. 3 टक्के आहे. भारतातील सर्वाधिक मृत्यू झालेल्या 10 जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरातमधील सर्वाधिक मृत्यूदर पंचमहाल येथे 11.11  इतका आहे. त्याखालोखाल आनंद (9.45), पाटण (8.55), अरावली (8.11) आणि भावनगर (7.96)) आहे. राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा मानल्या जाणार्‍या अहमदाबादमध्येही मृत्यूचे प्रमाण 7.12 आहे.

हे वाचा-मुलगा शहीद झाल्याच्या वृत्ताने कुटुंबावर शोककळा, दुसऱ्याच दिवशी जवानाचा आला फोन

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 17, 2020, 4:58 PM IST

ताज्या बातम्या