मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

हायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली!

हायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली!

 वॉररूमची (Pune Municipal Corporation Control Room) पोलखोल झाल्यानंतर आता पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) खडबडून जागी झाली आहे.

पुणे, 13 मे : मुंबई उच्च न्यायालयात  (Mumbai High Court)  पुण्याच्या कोरोना वॉररूमची (Pune Municipal Corporation Control Room) पोलखोल झाल्यानंतर आता पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) खडबडून जागी झाली आहे. वॉररूममध्ये कॉल सेंटरवर काम करणारी यंत्रणा पूर्णपणे बदलण्यात आली आहे.

पुण्यात कोरोनाने (Corona in Pune)थैमान घातले आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा म्हणून लोकांचे हाल होत आहे. पण, अशा परिस्थितीत बेड असून सुद्धा उपलब्ध नाही असा सांगण्याचा धक्कादायक प्रकार मुंबई उच्च न्यायालयानेच उजेडात आणल्यामुळे पुणे पालिकेच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश झाला होता.  पुण्यातील कोरोना वॉररूमध्ये कशा प्रकारेच खोटा प्रकार घडतोय, याची पोलखोल न्यायालयातच झाली होती.  त्यामुळे आता अखेर पुणे पालिकेला यात बदल करावे लागले आहे.

27 जूनला होणारी UPSC Prelims लांबणीवर, 'या' तारखेला होणार परीक्षा

पुणे महापालिकेकडून संपूर्ण यंत्रणाच आता बदलण्यात आली आहे. बेड्सची विचारणा करण्यासाठी कॉलरूमध्ये येणारे प्रत्येक फोन कॉल रेकॉर्ड केले जाणार आहे. जेणे करून कोणतीही खोटी माहिती दिला जाणार नाही.  या यंत्रणेत पूर्णपणे बदल केला गेला आहे.

काय घडलं होतं नेमकं?

पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवरुन मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान थेट न्यायालयातून बेडसाठी पुण्यातील कंट्रोल रूमला फोन करण्यात आला. पुण्यात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे  न्यायालयाच्या सूचनेनंतर न्यायालयातूनच थेट पुणे मनपाच्या कंट्रोल रूमला फोन करण्यात आला. यावेळी कोविडच्या डॅशबोर्डवर 4 व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध असल्याचं दाखवतं होतं मात्र, प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या बेड्सच्या संख्येत तफावत असल्याचं निदर्शनास आलं. यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे मनपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

First published:

Tags: Pune, Pune news