मराठी बातम्या /बातम्या /देश /

27 जूनला होणारी UPSC Prelims लांबणीवर, 'या' तारखेला होणार परीक्षा

27 जूनला होणारी UPSC Prelims लांबणीवर, 'या' तारखेला होणार परीक्षा

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा (coronavirus pandemic) फटका  होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेला (UPSC Prelims - 2021) देखील बसला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 13 मे : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचा (coronavirus pandemic) फटका यावर्षी होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेला (UPSC Prelims - 2021) देखील बसला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा 27 जून रोजी होणार होती. ती परीक्षा आता 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे.

यूपीएसीच्या परीक्षेत यंदा 712 तर भारतीय वन सेवा परीक्षेमध्ये 110 जागा रिक्त आहेत. देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. गेल्यावर्षी देखील या परीक्षेला कोरनोचा फटका बसला होता.  कोरोनाच्या धोक्यामुळे ही परीक्षा  स्थगित करावी लागली होती.

Sarkari Naukri 2021: लष्कर भरती या तीन राज्यांमध्ये थांबवली, कोरोनामुळे स्थगिती

देशातील सर्वात खडतर परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससीची परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होते. प्रिलीम, मेन्स आणि मुलाख असे हे तीन टप्पे आहेत. दरवर्षी जवळपास 2 लाख विद्यार्थी प्रिलिम्स परीक्षाला बसतात. उपलब्ध जागांच्या पाच पट विद्यार्थी हे मेन्ससाठी पात्र होतात.

25 हजारात सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल 3 लाखांपर्यंत कमाई, सरकारही करेल मदत

मेन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू देण्याची संधी मिळते. युपीएससीची अंतिम लिस्ट ही मेन्, आणि इंटरव्ह्यूमध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारे निश्चित केली जाते.

First published:

Tags: Exam, Upsc, Upsc exam