पुणे, 30 जुलै: पुणे मेट्रोची पहिली ट्रायल रन (Pune Metro first trial run) आज सकाळी वनाज कारशेड ते आनंदनगर दरम्यान पार पडली. वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गावरील वनाझ ते आयडियल कॉलनी (आनंदनगर) या टप्प्यात मेट्रोची चाचणी घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा देखील केली आहे. पुणेकरांचं मेट्रोचं (Pune Metro) स्वप्न पूर्ण करणारा हा ट्रायल रन ठरणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
सगळे म्हणतात सकाळी कार्यक्रम का घेतला. कोरोनामुळे छोटा आटोपशीर कार्यक्रम व्हावा म्हणून सकाळी 7 वाजता घेतला. सकाळी सहा वाजता ही यायची तयारी होती. मात्र ब्रिजेश दीक्षित सकाळी सहा वाजता कार्यक्रम नको म्हणाले. दीक्षित म्हणाले 7 वाजता घेऊ. पुणेकरांना सकाळी त्रास नको. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम घेतला असतं म्हणत सकाळी सकाळी सुरुवात केली की चांगलं असतं असं मिश्किल वक्तव्य अजित पवारांनी या कार्यक्रमा दरम्यान केलं आहे. तसंच लवकरच मेट्रोच्या आत बसून मोठा कार्यक्रम घेऊ, असंही ते म्हणालेत.
मेट्रोच्या कामादरम्यान त्रास सहन केलेल्या पुणेकरांचे अजित पवार यांनी आभार मानले. आत्तापर्यंत 7 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. मेट्रोचं काम सुरू असताना पुणेकरांनी संयम ,पेशन्स दाखवला म्हणून पुणेकरांचं कौतुक असंही अजित पवार म्हटले आहेत. स्वारगेट ते कात्रज हे एक्सटेन्शन उन्नत होणार नाही भुयारीच होईल अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
आज सुप्रीम कोर्टात ठरणार अनिल देशमुख यांचं भवितव्य
काम जिकिरीचं आहे. महापालिकेने पुढाकार घ्यावा असं म्हणत पिंपरी चिंचवड ते दापोडी ऑक्टोबर 2021 मध्ये तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्ग हा दोन्ही बाजूंना वाढवून निगडी ते कात्रज करण्याचा प्रयत्न असून तसंच वनाझ ते रामवाडी मार्ग दोन्ही बाजूनी वाढवून चांदणी चौक ते वाघोली करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणालेत. पुण्यात मेट्रोचे जाळे वाढवणार असून हडपसर भागातही मेट्रो नेण्याचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी आज म्हटलं आहे.
पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला कालच मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. पुण्याचा विकासाच आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे. काल मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत पीएमआरडीएची बैठक झाली. PMRDA अंतर्गत विविध प्रकल्प राबवायला 75 हजार कोटींचा निधी लागणार असून क्षेत्रफळाच्या नुसार PMRDA राज्यात सर्वात मोठं तर देशात क्रमांक 3 वर असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Metro, Pune, Pune metro