मराठी बातम्या /बातम्या /देश /अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण: संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता सुनावणी

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरण: संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता सुनावणी

Anil Deshmukh money laundering case: अनिल देशमुख  यांनी सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुरक्षेची मागणी केली.

Anil Deshmukh money laundering case: अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुरक्षेची मागणी केली.

Anil Deshmukh money laundering case: अनिल देशमुख यांनी सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी सुरक्षेची मागणी केली.

नवी दिल्ली, 30 जुलै: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सक्तवसुली संचालनायल म्हणजेच ED कडून दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money Laundering) सुरक्षेची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईपासून संरक्षण (plea seeking protection) मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. आज दुपारी 2 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर देशमुख यांनी केंद्रीय एजन्सीनं जारी केलेल्या समन्सला आव्हान दिलं असून त्यांचा मुलगा ऋषिकेशलाही संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पुणेकरांसाठी GOOD NEWS! पुणे मेट्रोची चाचणी

देशमुख यांच्यावर मुंबईतील अनेक हॉटेल बार मालकांकडून वसुली केल्याचा आरोप आहे. यासोबतच निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेनं देशमुखांच्या सूचनेनुसार 4.7 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वसूल केलेले पैसे नागपुरातील त्यांच्या मुलाच्या शिक्षण ट्रस्टजवळ पोहोचले, असं म्हटलं जात आहे.

अनिल देशमुखांविरोधात CBI चा तपास वेगानं

बुधवारी अनिल देशमुखां (Anil Deshmukh) विरोधातल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (Central Beureu of Investigation) सर्वांत मोठी छापेमारी (Raids) मोहिम राबवली आहे. अनिल देशमुखांविरोधात असलेल्या वसुली आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई सीबीआय (CBI) मार्फत करण्यात आली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी राज्यात 12 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं. त्यासोबतच यासह सीबीआयनंही अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या घरासह काही जागांवर छापे टाकले. राज्यातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), ठाणे (Thane), नाशिक, (Nashik), सांगली (Sangli) आणि अहमदनगर येथे सीबीआय अधिकाऱ्यांनी छापे टाकत सर्च ऑपरेशन राबवलं.

First published:
top videos

    Tags: Anil deshmukh, NCP, Supreme court, Supreme court decision