मराठी बातम्या /बातम्या /पुणे /News18 लोकमतचा Impact! पुण्यात आणखी 10 ventilator beds वाढवणार, रुग्णांचे हाल काहीसे होणार कमी

News18 लोकमतचा Impact! पुण्यात आणखी 10 ventilator beds वाढवणार, रुग्णांचे हाल काहीसे होणार कमी

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत कबुली दिली होती. मात्र आता तातडीनं नव्या व्हेंटिलेटरची व्यवस्था करत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत कबुली दिली होती. मात्र आता तातडीनं नव्या व्हेंटिलेटरची व्यवस्था करत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत कबुली दिली होती. मात्र आता तातडीनं नव्या व्हेंटिलेटरची व्यवस्था करत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

पुणे, 06 एप्रिल : पुण्यात कोरोनाचा होत असलेल्य स्फोटामुळं स्थिती गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर शिल्लक नसल्यामुळं रुग्णांचे हाल होत होते. यामुळं रुग्णांच्या नातेवाईकांच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. याबाबत न्यूज 18 लोकमतनं वृत्त दिल्यानंतर लगेचच इम्पॅक्ट पाहायला मिळाला असून, पालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे. त्वरित नव्या 10 व्हेंटिलेटरची व्यवस्था करत असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. तर 5 व्हेंटिलेटर बेड लवकरच रिकामे होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

(हे वाचा-'...तर 2-4 आठवड्यांतच कोरोना केसेस कमी होतील', कोव्हिड टास्क फोर्सने दिला मंत्र)

न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत कबुली दिली होती. मात्र आता तातडीनं नव्या व्हेंटिलेटरची व्यस्था करत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. महापालिकेनं 20 नवे व्हेंटिलेटर घेतले आहेत. त्यापैकी 10 बेड तातडीनं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. तसचं रुग्णांना अडचणी आल्यास तातडीने सोय उपलब्ध करून देण्याचं नियोजन करत असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. तसंच इतरही व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था लवकरच करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधा तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय.

(हे वाचा - पुण्यात कोरोनाची स्थिती हाताबाहेर? मनपा हद्दीत एकही व्हेंटिलेटर बेड मिळेना)

दरम्यान, याशिवाय 5 व्हेंटिलेटर बेड लवकरच रिकामे होत असल्यानं तेही रुग्णांना लवकरच उपलब्ध होतील अशी माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली. संसर्गाचा वेग प्रचंड वाढलेला असला तरी रुग्णांना बेड कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन मोहोळ यांनी दिलंय.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुगणांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या ही केवळ 489 आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही बेड शिल्लक नसल्याचं समोर आलं. रात्री उशिरानंतर यापैकी काही बेड उपलब्ध झाले. पण नंतर पुन्हा बेड फुल झाल्यानं नातेवाईकांकडून बेड मिळत नसल्याची ओरड होत होती. आयसीयू बेडचा विचार करता. पुण्यात मनपा आणि खासगी रुग्णालयात मिळून एकूण 430 आयसीयू बेड आहेत. त्यापैकी सोमवारी रात्री केवळ 2 उपलब्ध होते.

First published:

Tags: Corona, Covid-19, Good news, Health, Pune