मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'...तर 2-4 आठवड्यांतच corona प्रकरणं कमी होतील', covid 19 टास्क फोर्सने दिला मंत्र

'...तर 2-4 आठवड्यांतच corona प्रकरणं कमी होतील', covid 19 टास्क फोर्सने दिला मंत्र

राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.

राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.

राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.

मुंबई, 06 एप्रिल : एकिकडे राज्यात कोरोनाची (Coronavirus cases in Maharashtra) प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे फक्त राज्य सरकारच नाही तर केंद्र सरकारचंही टेन्शन वाढलं आहे. राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी केंद्राची टीमही पाठवण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोव्हिड  19 टास्क फोर्सच्या सदस्यांनी कोरोनाला रोखण्याचा मार्ग सांगितला आहे.

कोरोनाची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आहे पण गंभीर नाही, असं महाराष्ट्राच्या कोव्हिड 19 टास्क फोर्सचे सदस्य शशांक यांनी सांगितलं. कोरोनाची प्रकरणं दोन ते चार आठवड्यांतच कमी होऊ शकतात. पण त्यासाठी लोकांनी कोरोनासंबंधी नियमांचं नीट पालन करायला हवं. लसीकरणामुळे आजार आणि मृत्यूपासून संरक्षण मिळेल पण संसर्गापासून नाही, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - पुण्यात 8 नव्हे 6 च्या आत घरात; PMC ची नवी नियमावली जाहीर

प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न करावा. पुढील तीन ते सहा महिन्यात लशीचे बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतील. सध्याच्या लशी या जवळपास 12 महिने प्रतिकारक शक्ती देते. असं ते म्हणाले.

राज्यातील कोरोना प्रकरणं वाढत आहेत, यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊन आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. पण आरोग्य व्यवस्थ आधीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - कोरोनाबाबत महाराष्ट्राचा सकारात्मक रेकॉर्ड! आतापर्यंत 81 लाख जणांना मिळाली लस

रविवारी सर्वाधिक 57,074 नव्या कोरोना रुग्णांनंतर  सोमवारी राज्यात 47,288 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 155 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 30,57,885 वर पोहोचली आहे. तर  56,033 एकूण बळी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण 4,51,375 अॅक्टिव्ह केसेस आहेत. म्हणजे या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दिवसभऱात 26,252 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 25,49,075 झाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Fight covid, Maharashtra, Mumbai