गणेश दुडम, (पुणे) : पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय इन्स्टाग्रामवर टाकून ‘आय लव्ह यू’ असे लिहिणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अल्पवयीन मुलीने शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : सोशल मीडियावर व्हायरल झालेली डान्सर गौतमी पाटील कोण आहे? पाहा Inside Story
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय इन्स्टाग्रामवर टाकून ‘आय लव्ह यू’ असे लिहिणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन तरुणीने शिरगाव-परंदवडी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीवरुन आरोपी अमोल भोसुरे, यावर पोलिसांनी भादवी कलम 364 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीचे फोटो तिच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
हे ही वाचा : पुणेकरांच्या आनंदावर विरजण; गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होण्याआधीच रद्द, नेमकं काय घडलं?
दरम्यान त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेळोवेळी फोटो अपलोड करुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची माहिती समोर आली. यामुळे त्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक वनिता धुमाळ करत आहेत.