जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात भरधाव डंपरने बाईकस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO

पुण्यात भरधाव डंपरने बाईकस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO

पुण्यात भरधाव डंपरने बाईकस्वाराला चिरडलं, भीषण अपघाताचा थरारक VIDEO

बाईकस्वाराचा जागीच मृत्यू तर डंपरचालक घटनास्थळावरून फरार

  • -MIN READ
  • Last Updated :

हडपसर, 27 फेब्रुवारी : भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर चालकाने त्याच मार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी दुपारी 4 च्या सुमारास जगदंबा हॉटेल समोर हा अपघात झाला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्यातील हडपसर सासवड रोडवरील भेकराई नगर येथे ही घटना घडली. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हडपसर सासवड रोडवर कशा पद्धतीनं भरधाव येणाऱ्या डंपरनं दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. नवीन कुमार धरमसिंग नरगुंड (वय 42)असं या मृत तरुणाचं नाव आहे. सकाळी कामासाठी निघालेला असताना अचानक मागून भरधाव डंपने धडक देत दुचाकीसह चालकालाही चिरडल्यानं खळबळ उडाली. अपघातानंतर डंपरचालक डंपर घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. या डंपर चालकाविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

जाहिरात

हेही वाचा- काय सांगता, शेणाची चप्पल वापरल्यानं दूर होतो मानसिक ताण? अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या भेकराईनगरच्या चौकाजवळ सासवडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरचा धक्का दुचाकीस्वारास लागल्याने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो डंपरच्या चाकाखाली आला आणि या अपघातात डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. मागच्या दोन महिन्यात तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाटा या तीन किलोमीटरदरम्यान 4 जणांना अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. हेही वाचा- सुट्टीवर आलेल्या जवानाने केली पत्नीची हत्या, 2 वर्षापूर्वीच झाला होता प्रेमविवाह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात