नाशिक 27 फेब्रुवारी : सुट्टीवर आलेल्या एका सैनिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केलीय. दोन वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झालेलं होत. आणि तीन महिन्यांची मुलगी होती. या हत्येनं शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. चैताली बावा असं महिलेचं नाव आहे. बुधवारी रात्री तिची तिच्याच नवऱ्यानं गळा दाबून हत्या केलीय. नवरा सुनील बावा हा श्रीनगर येथे लष्करात नोकरी करतो. दहा दिवसांसाठी सुनील बावा हा नाशिकला सुट्टीवर आला होता. चैताली हिच्याकडे वारंवार माहेरूहून पैसे आणण्याचा तो तगादा लावत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय. त्यातूनच हा वाद झाल्यानं सुनील याने गळा दाबत तिची हत्या केलीय. हत्येनंतर सुनील याने स्वतःला संपविण्याचाही प्रयत्न केला. चाकूने स्वतःच्या हातावर वार करून घेत नस कापून घेतली होती. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपीने कल्याण येथे राहणाऱ्या चुलत भावला फोन केला होता. त्यावेळी भारती वहिनी कुठे आहे विचारले असता आरोपी बावा याने ती स्वर्गात गेली असे सांगितले. त्यावेळी चुलत भाऊ असलेल्या भारती याला संशय आल्याने त्याने लागलीच त्या मुलीच्या माहेरी फोन करून माहिती दिली. त्यावरून ही सगळी घटना उघडकीस आलीय. दोन वर्षांपूर्वीच चैताली आणि सुनील यांचा विवाह झाला होता. अगदी अडीच ते तीन महिन्यांची छोटीशी मुलगी देखील आहे. चैतालीची हत्या केल्याने सुनील बावा या सैनिकांवर म्हसरुळ पोलिसांनी खुनाचा दाखल केलाय. सुट्टीवर आलेल्या सैनिकाने पत्नीची हत्या केल्यानं शहरात एकच खळबळ उडालीय. मात्र अडीच महिन्याच्या चिमुरडीला आपल्या बापाच्या या कृत्यामुळे आईची माया मिळणार नसल्यानं नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. हेही वाचा…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.