शेणापासून चप्पल तयार होते असं कधी आपण पाहिलं आहे का? विश्वास बसणार नाही पण होय. ऐकून थोडं नवल वाटेल पण शेणापासून चप्पल तयार करण्यात आली आहे. देशी गायींच्या शेणापासून ही खास चप्पल तयार करण्यात आली आहे.
देशी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेली ही चप्पल जगभरातील पहिली असल्याचा दावा केला जात आहे. याचं खास प्रदर्शन मंडी इथे अंतरराष्ट्रीय शिवरात्रि महोत्सवात करण्यात आलं. ह्या चपला लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होत्या.
शेणापासून चप्पल हे ऐकूनच तिथे आलेला प्रत्येक जण हैराण झाला. हरियाणातील मंडी इथे वैदिक प्लास्टर नावाच्या संस्थेनं ही चप्पल तयार केली आहे.
ही चप्पल साधारण नाही. ही चप्पल पायात घातल्यानंतर आजारांपासून सुटका मिळेल. तसंच आपला रक्तदाब नियंत्रित राहिल आणि मानसिक ताणही दूर होईल असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.
श्री बंशी गौधाम काशीपूर उतराखंड इथून ही चप्पल प्रमाणित करून घेण्यात आली आहे. या चपलेला गौमय चरण पादुका असं नावही देण्यात आलं आहे.
याशिवाय चिडचिडेपणा, पायांमध्ये येणारा थकवा, बेचैन असणं या सगळ्या गोष्टींपासून ही चप्पल आराम देते असा दावाही या संस्थेनं केला आहे.
शेणामध्ये जीवाणुनाशक आणि विषाणुंना मारण्याची ताकद असते. शेण थंड असतं, किटाणुंचा सर्वनाश करण्यासाठी शेणाचा वापर केला जातो. वैज्ञानिकदृष्ट्या शेणाचे अनेक फायदे आहेत.
शेणापासून चपला तयार करण्यासाठी शेणात नैसर्गिक तेल घालून एकजीव करण्यात आलं आहे. त्यानंतर सुकवून मशीमध्ये आकार देण्यात आला आहे. ह्या चपला सध्या प्रदर्शानासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र लोकांच्या मागणीनुसार त्या तयार केल्या जाणार असल्याची माहिती कर्ण सिंह यांनी दिली आहे. याची किंमत साधारण 700 रुपयांपर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. मंडी इथे झालेल्या प्रदर्शनात शेणापासून तयार करण्यात आलेल्या या शेणाच्या चपलेची मात्र जगभरात चर्चा होत आहे.