पुणे, 23 ऑगस्ट: महिलांना सैन्य दलात भरती करून घेण्याबाबत अलीकडेच सुप्रीम कोर्टानं (Supreme Court on NDA Exam) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. येथून पुढे महिलांनाही एनडीएची परीक्षा देण्याची (Woman Can Take NDA Exam) परवानगीबाबत न्यायालयानं शिक्कामोर्तब केला आहे. असं असताना पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमानास्पद घटना समोर आली आहे. पुण्यातील अदिती कटारे हिची नुकतीच भारतीय वायुदलात निवड (Aditi Katare selected in Indian Air Force) झाली आहे.
त्यामुळे आता अदिती काही दिवसांतच वायूदलाच्या विमानानं आकाश भेदणार आहे. एकीकडे महिलांना एनडीएची परीक्षा देण्याची परवानगी नसताना अदितीनं मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे अनेक स्तरातून अदितीचं कौतुक केलं जात आहे. कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेतल्यानंतर लष्करी सेवेकडे वळल्यामुळे अनेकांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
हेही वाचा-IIT होऊनही दिली UPSCची परिक्षा; IAS कनिष्क कटारियांनी का घेतला हा निर्णय?
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, अदिती ही मुळची चिंचवड परिसरातील शाहूनगर येथील रहिवासी आहेत. तिचं शालेय शिक्षण चिंडवड येथील कमलनयन बजाज शाळेत पूर्ण झालं आहे. यानंतर तिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील व्हिआयटीमध्ये पूर्ण केलं आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या अदितीनं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगची पदवी 80 टक्के गुणांसह मिळवली आहे. सध्या ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा-कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी सोडला नाही अभ्यास; बुशरा बानो जिद्देने झाल्या IAS
असं असलं तरी लष्करी सेवेत जाण्याची ओढ तिला शांत बसू देत नव्हती. त्यामुळे तिनं योग्य मार्गदर्शन घेत आपल्या ध्येयाला गवसनी घातली आहे. यावेळी अदिती म्हणाली की, 'लष्करी सेवेत जाण्याची ओढ असल्यानं त्यासाठी प्रयत्न केले आणि अपेक्षित यशही मिळालं आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे. मला निवृत्त कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाचा अतिशय फायदा झाला आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune