नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : यूपीएससी परीक्षा
(UPSC Exam) पास होणं तसं फार सोपं नसतं. यासाठी खडतर मेहनत, जिद्द आणि चिकाटी अंगी असावी लागते. याशिवाय तासनतास अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनसुद्धा फार कमी विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश
(Successes) मिळतं. राजस्थानच्या जयपूरमध्ये
(Jaipur, Rajasthan) राहणाऱ्या कनिष्क कटारिया
(IAS Kanishka Katariya) यांनी देखील UPSC परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत घेऊन यश मिळवलं. त्यांचे शिक्षण सेंट पॉल्स सीनियर सेकंडरी स्कूलमध्ये
(St. Paul's Senior Secondary School) झालं. बारावीनंतर त्यांनी IIT JEE परीक्षा दिली. या परीक्षेमध्ये त्यांना 44वा रॅक मिळाला.
त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये IIT Bombayमध्ये कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये B.Tech ची डिग्री घेतली. ग्रॅज्युएशन नंतर त्यांना सॅमसंग कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून साउथ कोरियामध्ये नोकरी मिळाली. त्या नोकरी मधून चांगला पगार मिळत असूनही त्यांना मानसिक समाधान नव्हतं त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि बंगळुरूमध्ये एका कंपनीमध्ये डाटा सायंटिस्टची नोकरी केली.
(
कामाच्या ताणाचा मुलांवर निघतो राग? चांगलं बॉन्डिंग करण्यासाठी करा ‘हे’ उपाय)
वडिलांच स्वप्न
कनिष्क लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. त्यामुळे त्यांचे वडील आणि काका यांची त्यांनी आयएएस अधिकारी
(IAS Officer) होऊन देशसेवा करावी अशी इच्छा होती. कनिष्क यांच्या वडिलांना त्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये जावा असं वाटत असलं तरी कनिष्क यांची इच्छा नव्हती मात्र, भारतात परतल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.
(
तुम्हालाही असतील ‘या’ 6 वाईट सवयी तर, वेळीच बदल करा; घरात पसरेल घाणीचं साम्राज्य)
त्यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये राहून सात ते आठ तास अभ्यास केला. 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी UPSC परीक्षा पास करत वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्क यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्यामते UPSC परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मागच्या वर्षांच्या पेपर आणि टेस्टचा देखील अभ्यास करायला हवा.
(
अशी बदलंली परिस्थिती की,डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऋषिता गुप्ता झाल्या IAS)
कनिष्क यांना लहानपणापासूनच गणितामध्ये रस होता. त्यामुळे त्यांनी मेन्स परीक्षेमध्ये ऑप्श्नल सब्जेक्ट म्हणून गणित हाच विषय निवडला. कनिष्क दिवसाचे 13 ते 14 तास अभ्यास करायचे. याच काळात त्यांनी सोशल मीडिया पासून अंतर राखत अभ्यासावर फोकस केला. कनिष्क सांगतात, “युपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर, विद्यार्थ्यांनी मेहनत करावी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.