मराठी बातम्या /बातम्या /करिअर /कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी सोडला नाही अभ्यास; बुशरा बानो जिद्देने झाल्या IAS

कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी सोडला नाही अभ्यास; बुशरा बानो जिद्देने झाल्या IAS

लग्नानंतर बुशरा बानो  (IAS Bushra Bano) पतीबरोबर सौदी अरेबियाला (Saudi Arabia) गेल्या. पण, अतिशय सामान्य घरांमध्ये जन्मलेल्या बुशरा यांचं स्वप्न वेगळं होतं.

लग्नानंतर बुशरा बानो (IAS Bushra Bano) पतीबरोबर सौदी अरेबियाला (Saudi Arabia) गेल्या. पण, अतिशय सामान्य घरांमध्ये जन्मलेल्या बुशरा यांचं स्वप्न वेगळं होतं.

लग्नानंतर बुशरा बानो (IAS Bushra Bano) पतीबरोबर सौदी अरेबियाला (Saudi Arabia) गेल्या. पण, अतिशय सामान्य घरांमध्ये जन्मलेल्या बुशरा यांचं स्वप्न वेगळं होतं.

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : यूपीएससी (UPSC)  सारखी कठीण परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थी खूप मेहनत घेतात. कधीकधी पहिल्या प्रयत्नात अपयशाची चव चाखावी लागते. पण, सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अधिकारी होण्याचं स्वप्न (Dream to Became Officer) पूर्ण होऊ शकतं. यूपीएससी परीक्षेसाठी (UPSC Exam) देशभरातून लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. प्रत्येक विद्यार्थ्याची जिद्दीची आणि यशस्वी होण्याची एक वेगळीच कहाणी (Story) असते. बुशरा बानो हिची देखील अशीच एक प्रेरणादायी कहाणी (Inspirational Story) आहे. विवाहानंतर पती, संसार, मुलांची जबाबदारी आणि त्यानंतर आयएएस अधिकारी (IAS Officer) असा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. बुशरा यांनी 2018 मध्ये सिविल सर्विस परीक्षेमध्ये (Civil Service Exam) यशस्वी होऊन 277 रँक मिळवून लहानपणापासून पाहिलेलं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

लग्नानंतर त्या पतीबरोबर सौदी अरेबियाला (Saudi Arabia) गेल्या. त्यांचे पती तिथे प्राध्यापकाची नोकरी करत होते. पण, अतिशय सामान्य घरांमध्ये जन्मलेल्या बुशरा यांचं स्वप्न वेगळं होतं. त्यामुळे सौदी अरेबियातही त्यांना समाधान मिळत नव्हतं.

(महिलांना होणारा ‘हा’ आजार प्रोबियोटिक्सने होतो कमी; या पद्धतीने घेतल्यासच फायदा)

त्या अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या(Muslim University of Aligarh) रेसिडेन्शिअल कोचिंग अकॅडमीच्या विद्यार्थी होत्या तर, अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करत असताना त्यांचं लग्न झालं.

(औषधी गुळाचे आहेत बरेच फायदे; आरोग्याबरोबर त्वचेसाठीही उपयोगी)

लग्नानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यानंतरही त्यांना आपल्या देशाची आठवण येत होती. आपल्या देशासाठी आपण काहीच करू शकलो नाही याची खंत त्यांच्या मनात राहत होती. त्यामुळेच त्यांनी UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र हे त्यांच्यासाठी एक मोठं आव्हानच होतं. घर, पती आणि मुलं यांना सांभाळताना नोकरी करत अभ्यास करणं म्हणजे तारेवरची करत होती. मात्र बुशरा यांनी हे आव्हान स्वीकारलं पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि यशस्वी झाल्या. UPSC परीक्षेसाठी बुशरा यांनी मॅनेजमेंट हा पर्यायी विषय निवडलेला होता.

(Second Home घेणार असाल तर या 10 गोष्टी कायम लक्षात ठेवा!)

UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील त्या पर्यायी विषय निवडताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते ज्या विषयावर आपली चांगली पकड आहे तोच विषय पर्यायी सब्जेक्ट निवडणं योग्य असतं. कठीण विषय निवडला तर पुढे अभ्यासाला अडचणी निर्माण होतात.

First published:
top videos

    Tags: Ias officer, Inspiring story, Success stories, Upsc exam