पुणे, 20 जुलै: चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूकीत गोळीबार (Firing) केल्याचा राग मनात धरून आरोपीचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगरांना हत्येची सुपारी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुण्यातील माजी नगरसेवकासह चार जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहे. तसेच आरोपींकडून सव्वा लाख रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
राजन जॉन राजमणी (वय-38 भाग्योदय नगर, कोंढवा) आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख (वय-27, काळा खडक, वाकड) असं अटक केलेल्या सुपारी किलरची नावं आहेत. तर पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक विवेक यादव विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस आरोपींचे जबाब नोंदवून घेत आहेत.
हेही वाचा-Pune: पुस्तकं द्यायला आलेल्या विद्यार्थिनीसोबत मुख्याध्यापकाचं संतापजनक कृत्य
नेमकं काय घडलं?
आरोपी राजन राजमणी आणि त्याचा मित्र इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख हे दोघंही सराईत गुन्हेगार आहेत. शहरात अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. संबंधित दोघंही काही दिवसांपूर्वी कोविडची रजा घेऊन येरवडा कारागृहाबाहेर आले आहेत. दरम्यान दोघांनी कोणाच्या तरी हत्येची सुपारी घेतली असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून आरोपी राजन राजमणी आणि इब्राहिमला लुल्लानगर परिसरातून अटक केली.
हेही वाचा-मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलावरीनं सपासप वार; घटनेचा थरारक VIDEO आला समोर
अटक केल्यानंतर दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे तीन गावठी पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे आढळली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे सव्वा लाख रुपयांची रोख रक्कम देखील आढळली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, पुण्यातील कँटोन्मेट बोर्डाच्या माजी नगरसेवकानं हत्येची सुपारी दिल्याचं कबुल केलं आहे. बबलु गवळी नावाच्या युवकानं चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर गोळीबार केला होता. हा बदला घेण्यासाठी नगरसेवक यादव यानं बबलू गवळी याची सुपारी दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gun firing, Pune