Home /News /mumbai /

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलावरीनं सपासप वार; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलावरीनं सपासप वार; घटनेचा थरारक VIDEO आला समोर

Viral Video: मुंबईत चार ते पाच जणांच्या टोळक्यानं भररस्त्यात एका वकिलावर (Lawyer) तलवारीनं जीवघेणा हल्ला (Sword Attack) केल्याची घटना समोर आली आहे.

    मुंबई, 19 जुलै: चार ते पाच जणांच्या टोळक्यानं भररस्त्यात एका वकिलावर (Lawyer) तलवारीनं जीवघेणा हल्ला (Sword Attack) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी भररस्त्यात वकिलावर तलवारीनं वार करत आहेत. या घटनेचा सर्व थरार परिसरातील एका नागरिकानं आपल्या मोबाइल फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना बेड्या (3 Arrest) ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सत्यदेव जोशी असं तलवारीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वकिलाचं नाव आहे. तर संबंधित घटना 8 जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-Osmanabad: अधिकारी होताच विसरला गरीबी; 40हजारांची लाच घेताना तरुणाला रंगेहाथ अटक व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असून तीन जणांना अटक केली आहे. एमएचबी पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध कलम 307, 326, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियातून चांगलाच व्हायरल होतं आहे. हेही वाचा-उसाच्या फडात नेत जबरदस्ती विवाह; 28वर्षीय तरुणानं पाचवीतील मुलीशी बांधली लग्नगाठ उस्मानाबादेत डॉक्टरचा वकिलावर हल्ला दुसऱ्या एका घटनेत, उस्मानाबादमध्ये डॉक्टरनं वकिलावर हल्ला केला आहे. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचं वकीलपत्र सोडून दे, अथवा जीव घेऊ, अशी धमकी देत डॉक्टरने वकिलावर हल्ला केला आहे. या घटनेत प्रथमेश मोहिते नावाचा वकील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. अरुण मोरेसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपी डॉक्टर हा जखमी वकिलाचा मेव्हुणा आहे. या घटनेतील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai, Viral video.

    पुढील बातम्या