पुणे, 16 सप्टेंबर : पुण्यातील सिंहगड रोड जवळील भाऊ इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग (Fire in Bhau industrial estate company Pune लागली. नांदेड फाटा (Nanded Phata) येथील कंपनीत ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या.भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये बर्थडे क्रॅकर बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अग्निशमन दलाने 8 फायर गाड्यांच्या मदतीने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असून कॉलिंग काम सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंपनीत एक स्फोट झाला आणि त्यानंतर ही आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली, स्फोट कशाचा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. सिलिंडर किंवा केमिकलमुळे स्फोट झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमधील कंपनीला भीषण आग pic.twitter.com/xO2EmEhAet
— News18Lokmat (@News18lokmat) September 16, 2021
कंपनीला लागलेली आग ही इतकी भीषण आहे की, आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. पुण्यातील वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरण, पीडित मुलीवर ठाण्यातही अत्याचार झाल्याचं समोर उरवडे दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या उरवडे गावाजवळील केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत 18 जणांचा मृत्यू झाला होता. 7 जून 2021 लागलेली ही आग अवघ्या काही क्षणातच झपाट्याने पसरली होती आणि स्वयंचलित दरवाजा स्फोटाच्या प्रेशरने बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना बाहेर पडणं अशक्य झाल्याने होरपळून मृत्यू झाला होता.