मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Pune Fire News: पुण्यातील 70 वर्ष जुन्या मार्केटमध्ये भीषण आग, 25 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

Pune Fire News: पुण्यातील 70 वर्ष जुन्या मार्केटमध्ये भीषण आग, 25 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

Pune Latest News: मुंबईपाठोपाठ आता पुण्यातून आगीची (Pune Fire) भीषण घटना समोर येते आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

पुणे, 16 मार्च: मुंबईपाठोपाठ आता पुण्यातून आगीची (Pune Fire) भीषण घटना समोर येते आहे. पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटला (Shivaji Market Fire) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये बाजारपेठेतील 25 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी (25 Shops Catches Fire in Pune) आली आहेत. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यातून आगीची भीषणता लक्षात येऊ शकते.

पुण्यातील आगीच्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. हे मार्केट साधारण 70 वर्ष जुनं आहे. पहाटे लागलेल्या आगीमुळे 25 दुकानं जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जवळपास तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आता ही आग विझवण्यात यश मिळालं आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

याठिकाणी अग्निशमन दल साधारण तासभर आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांना आग विझवण्यात यश मिळालं आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अचानक आग लागल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली होती.

मुंबईत देखील एका इनोव्हा कारला रस्त्यावरच आग लागल्याची घटना समोर आली होती. त्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. गाडीने पेट घेताच गाडीतील व्यक्ती बाहेर पडून त्यांनी आपला जीव वाचवला मात्र कार यामध्ये जळून खाक झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Fire, Maharashtra, Mumbai, Pune, Pune fire, Pune news, Shivaji market