पुणे, 30 एप्रिल: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी कोरोना नियम पायदळी तुडवले जात आहेत. ऐन लॉकडाऊनच्या काळात पुण्यातील एका फार्म हाऊसवर चक्क बारबाला (Dance Bar at Farm House in Pune) आणून नाचवल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे, तर संबंधित फार्म हाऊसवर वेश्याव्यवसायही (Prostitution) सुरू असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा (Pune police raid) टाकून 9 जणांना अटक केली आहे. तर इतर पाच तरुणींची सुटका देखील केली आहे. या घटनेचा पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत. संबंधित घटना पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडजे या गावातील आहे.संबंधित घटना पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडजे या गावातील आहे. याठिकाणी पुणे महानगर पालिकेतील पथ विभागात कार्यरत असणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याने ठेकेदारांसोबत जंगी पार्टी केली आहे. यावेळी त्यांनी मुंबई आणि पुण्यातील काही तरुणींना खडकवासला धरणाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या कुडजे गावतील लबडे फार्म हाऊसवर आणलं होतं. याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, उत्तम नगर पोलिसांनी छापा टाकून सदर अभियंता, तीन कॉन्ट्रॅक्टर, फार्म हाऊस मालक व इतर 4 अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून सर्वांना अटक केली आहे. आरोपींपैकी विवेकानंद बडे हा पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. यामध्ये काही जण भाजपचे पदाधिकारी असल्याची माहितीही समोर आली आहे. हे वाचा- कुंभनगरीत पाप! बाजारात विकलं जातंय Duplicate Remdesivir; पोलिसांनी केला पर्दाफाश फार्म हाऊसचे व्यवस्थापक समीर पायगुडेसह पार्टीचे आयोजन करणारे विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालायाने 3 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अन्य आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला असता, फार्म हाऊसमध्ये मुलींच्या डान्ससह अनेकजण मद्यधुंद अवस्थेत आढळले आहेत. त्याचबरोबर याठिकाणी वेश्याव्यवसायही सुरू असल्याचं पोलिसांना आढळलं आहे. पोलीस या घटनेची पुढील कारवाई करत आहेत. हे वाचा- लॉकडाऊनमध्येही तळीरामांची चंगळ; पुण्यात फेसबुकवरून होतेय दारूची विक्री मुंबईहून आणल्या डान्सर सुटका केलेल्या पाच तरुणींना अटकेत असणाऱ्या प्राजक्ता जाधव नामक महिलेनं मुंबईहून आणलं होतं. यातील एक तरुणीही पुण्यातील रहिवासी असून अन्य तिघी या मुंबई, कल्याण आणि ठाणे परिसरातील रहिवासी आहेत. त्याचबरोबर एक तरूणी मुळची सिलीगुडी येथील रहिवासी असून तीही सध्या मुंबईतच वास्तव्याला होती. या पाचही जणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची रवानगी रेस्क्यु फाऊंडेशनला करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.