हरिद्वार, 28 एप्रिल : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेलं रेमडेसिवीर (Remdesivir) औषध. या औषधाचा काळाबाजार करण्यासोबतच आता नकली रेमडेसिवीर औषधही (Duplicate Remdesivir racket) तयार केलं जातं आहे. आता नकली रेमडेसिवीर औषधंही विकायला सुरुवात केली आहे. कुंभनगरीतच असं बनावट रेमडेसिवीर औषध तयार केलं जातं आहे. अशाच एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
दिल्लीत नकली रेमडेसिवीर (Delhi Duplicate Remdesivir) इंजेक्शनसह आरोपीला पकडण्यात आलं होतं. त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्या दिशेने कारवाई सुरू करण्यात आली. नकली रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. पोलिसांनी छापेमारी सुरू झाली.
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये असे नकली रेमडेसिवीर इंजेक्शन तयार होत असल्याची माहिती मिळाली. दिल्लीहून क्राइम ब्रांचची टीम हरिद्वारला पोहोचली. तिथं छापेमारी करण्यात आली. रानीपूर परिसरातील एका घरावर मंगळवारी रात्री छापा टाकण्यात आला. तिथं तब्बल तीन हजार इंजेक्शनच्या रिकाम्या कुपी जप्त करण्यात आल्या आहेत. आता अनेक औषध डिलर पोलिसांच्या रडारवर आहेत.
हे वाचा - खळबळजनक! एकाच शहरातील 3000 कोरोना रुग्ण बेपत्ता; मोबाइलही केले स्विच ऑफ
याआधी महाराष्ट्रात मुंबईतही डुप्लिकेट औषध विकल्याचं आढळलं होतं. रेमडेसिविरच्या नावावर दुसरंच इंजेक्शन विकलं जात होतं. पालघर जिल्ह्यापर्यंत त्याची लिंक लागली. पोलिसांनी 4 अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचं पथक तयार केलं. ज्या नंबरवर पैसे पाठवले त्याचं लोकेशन तपासलं असता ते पालघर जिल्ह्यातल्या वाळीवमध्ये निघालं. तपास पथक लगेच तिकडे रवाना झालं. संबंधित लोकेशनवर पोहोचल्यानंतर ट्रकसोल - एस 1 हे अँटी बायोटिक्स रेमडेसिविर नावाने विकल्याचं स्पष्ट झालं. विविध ठिकाणी 7 जणांना असे एकूण 29 इंजेक्शन विकल्याची कबुली आरोपीने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Delhi, Uttarakhand