मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Huge Relief : पुण्यात सोमवारी अवघे 494 नवे कोरोनाबाधित!, सलग पाच दिवस दिसला रुग्णसंख्या घटण्याचा ट्रेंड

Huge Relief : पुण्यात सोमवारी अवघे 494 नवे कोरोनाबाधित!, सलग पाच दिवस दिसला रुग्णसंख्या घटण्याचा ट्रेंड

Pune Corona Update सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Pune Corona Update सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Pune Corona Update सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 24 मे : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (corona second wave) रोज नवे नवे उच्चांक पाहाऱ्या पुण्यात (Pune corona cases decrese) आता रोज कोरोना रुग्णसंख्येचे नव नवे नीचांक पाहायला मिळत आहेत. पुण्यात परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की, कोरोना रुग्णांच्या रोजच्या संख्येनं प्रशासनाचे डोळे पांढरे होत होते. पण सोमवारी या सर्वातून पुण्याचा प्रचंड मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी पुण्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही 500 च्या आत असल्याचं पाहायला मिळालं. Pune corona cases under 500

(वाचा-कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला मिळालं नवं शस्त्र, अँटीबॉडी कॉकटेल लॉन्च)

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही संपूर्ण राज्यासाठीदेखिल चिंतेची बाब होती. संपूर्ण देशात कोरोनाचा अत्यंत झपाट्यानं विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या नकोशा यादीत देखिल पुण्याला स्थान मिळालं होतं. पण एवढी गंभीर परिस्थिती झाल्यानंतरही पुणे महानगरपालिका प्रशासनाने अत्यंत योग्यरित्या नियोजन करून कोरोनाला आळा घालण्यात यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच परिमाण म्हणजे सोमवारी पुण्यात नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा अवघा 494 होता. त्यामुळं 500 च्या आत रुग्णसंख्या असल्यानं सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

(वाचा-Black, White नंतर Yellow Fungus, आणखी एक भयंकर फंगल इन्फेक्शन; अशी आहेत लक्षणं)

सोमवारचा ट्रेंड!

पुण्यात सोमवारी कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा विचार करता हा आकडा जवळपास रुग्णांच्या तिप्पट म्हणजे 1410 एवढा होता. सोमवारी पुण्यात झालेल्या कोरोनाच्या एकूण चाचण्यांचा आकडा हा 7582 एवढा होता. रविवारी केलेल्या चाचण्यांचा आकडा त्यामानानं कमी असतो. त्यामुळं सोमवारचा आकडा कमी येण्याचा ट्रेंडही पाहायला मिळतो. पण रुग्णसंख्या कमी झाल्यानं पुण्याच्या महापौरांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रेयत याला Huge Relief म्हणजेच मोठा दिलासा असं म्हटलं आहे. सक्षमपणे लढू, कोरोनाला हरवू, असं म्हणत त्यांनी कोरोना विरोधातील लढ्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पुण्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये गेल्या पाच दिवसांत सातत्यानं घट झाल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला. पुण्यात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता, 20 मे रोजी 931, 21 तारखेला 973, 22 मे रोजी 840 तर रविवारी 21 मे रोजी 709 एवढी होती. मात्र सोमवारी हा आकडा आता 500 च्याही खाली आला आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली ही सकारात्मक घटत अशीच कायम राहिली तर पुढच्या काही दिवसांत चित्र आणखी चांगलं होणार आहे. झपाट्यानं होत असलेला कोरोनाचा प्रसार रोखून त्याला आळा घालण्यासाठी पुण्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे आणि प्रशासनाचं काम खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune