मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला मिळालं नवं शस्त्र, गंभीर रुग्णांसाठी वापरता येणार अँटीबॉडी कॉकटेल

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताला मिळालं नवं शस्त्र, गंभीर रुग्णांसाठी वापरता येणार अँटीबॉडी कॉकटेल

कोरोना रुग्णांवर (Corona Patients) उपचारासाठी भारतात आणखी एक औषध लॉन्च झालं आहे. रोश इंडिया (Roche India) आणि सिप्लानं (Cipla) सोमवारी भारतात हे औषध लॉन्च केलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 मे : कोरोना रुग्णांवर (Corona Patients) उपचारासाठी भारतात आणखी एक औषध लॉन्च झालं आहे. रॉशे इंडिया (Roche India) आणि सिप्लानं (Cipla) सोमवारी भारतात हे औषध लॉन्च केलं आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात याचा वापर होणार आहे. सिप्ला आणि रोशनं म्हटलं आहे, की ही अँटीबॉडी कॉकटेल आता भारतात उपलब्ध आहे. याची दुसरी खेप जुनच्या मध्यापर्यंत देशात दाखल होईल. रोशनं या कॉकटेल औषधात कासिरिविमॅब आणि इमदेविमॅब (Casirivimab and Imdevimab) सामील केलं आहे. याच्या आपात्कालीन वापरास भारतात परवानगी मिळाली आहे.

सध्या भारतात अँटीबॉडी कॉकटेलचे केवळ 1,00,000 पॅक उपलब्ध आहेत. यातून तब्बल 2 लाख कोरोनाबाधितांवर उपचार करता येईल. कोरोनाविरोधातील लढाईत हे औषध महत्त्वाचं मानलं जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, एका पॅकेटमध्ये दोन रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. अमेरिकेतही याच्या आपात्कालीन वापरास परवानगी मिळाली आहे.

भारतात या अँटीबॉडी कॉकटेलची किंमत 59,750 इतकी आहे आणि हे औषध कोरोनाच्या अत्यंत गंभीर रुग्णांसाठी आहे. सिप्ला देशभरात आपल्या मजबूत वितरण क्षमतेच्या मदतीनं या औषधाचं वितरण करेल. या औषधासाठी एका रुग्णामागे 59,750 रुपयांचा खर्च येईल. यात सर्व प्रकारचे करही सामील असतील. कोरोना रुग्णांना हे औषध प्रमुख रुग्णालयं आणि कोविड केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होईल. या औषधात्या मल्टीडोसची किंमत 1,19,500 रुपये आहे.

याआधी मागील आठवड्यातच सिप्लानं कोविडची चाचणी करण्यासाठी नवीन RT-PCR कीट 'ViraGen' लॉन्च करण्याची घोषणा केली होती. कंपनीचं असं म्हणणं आहे, की यामुळे कोरोना रिपोर्ट तात्काळ समजू शकेल. हे कीट 25 मेपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. सध्या देशात कोरोना रिपोर्ट येण्यास बराच वेळ लागत असल्यानं रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे कीटही रुग्णांसाठी अत्यंत उपयोगी आणि वरदान ठरणार आहे.

First published:

Tags: Corona patient, Medicine, Symptoms of coronavirus