जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला खुलासा

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला खुलासा

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ पुण्यातही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला खुलासा

ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली इथे जसा कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे, तसा पुण्यातही होणार का याविषयी चर्चा सुरू आहे. News18 लोकमला दिलेल्या माहितीत पुण्याच्या आयुक्तांनी याबाबत खुलासा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 2 जुलै : पुण्यात गेल्या 24 तासांत Coronavirus चा संसर्ग झाल्याची सर्वाधिक प्रकरणं समोर आली आहेत. पुणे महापालिकेने कंटेन्मेंट झोनमध्येही वाढ केल्याचं जाहीर केलं आहे. आता मुंबईबाहेरच्या उपनगरांमध्ये जसा कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे, तसा पुण्यातही होणार का याविषयी चर्चा सुरू आहे. News18 लोकमला दिलेल्या माहितीत पुण्याच्या आयुक्तांनी याबाबत खुलासा केला. ठाणे, नवी मुंबई, पनवेल,  मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली या मुंबईच्या बाहेरच्या उपनगरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या महापालिकांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या शहरांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडायला मनाई करण्यात आली आहे. तसंच सगळी दुकानंही बंद ठेवायचा आदेश आहे. पुण्यातही असा कडक लॉकडाऊन होणार का याविषयी चर्चा सुरू आहे. रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोरोनाचा परिणाम म्हणून घेतला हा निर्णय पुण्यात Covid-19 चा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण पुण्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. पण तूर्तास लॉकडाऊनचा कुठलाही विचार नाही, असं पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केलं. उलट लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांनी विनाकारण बेड्स अडवून ठेवू नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये  तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे. FAIR गेला आता फक्त GLOW दिसणार; 45 वर्षांनी हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय पुण्यात टेस्टिंग वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बांधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18000 रुग्णांना हॉस्पिटल किंवा क्वारंटाइन सेंटमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज शेखर गायकवाड यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.  पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत. पण व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ससून हॉस्पिटलला व्हेंटिलेटर्सची आवश्यकता असल्याने हे व्हेंटिलेटर आता ससून हॉस्पिटलला सुपूर्त केले जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. संकलन - अरुंधती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात