जाहिरात
मराठी बातम्या / देश / रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोरोनाचा परिणाम म्हणून घेतला हा निर्णय

रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोरोनाचा परिणाम म्हणून घेतला हा निर्णय

रेल्वे भरतीबाबत सरकारची मोठी घोषणा; कोरोनाचा परिणाम म्हणून घेतला हा निर्णय

रेल्वेच्या या निर्णयामुळे तरुण वर्गावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली. 2 जुलै : कोरोना संकटाच्या वेळी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने नवीन भरतीवर बंदी करीत असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन वर्षातील नवीन पदांचा आढावा घेण्यात येईल आणि 50 टक्के पदे सरेंडर केल्या जातील, असेही रेल्वेने परिपत्रक काढून जाहीर केले. कोरोना काळात आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. पुढील आदेशापर्यंत कोणतीही नवीन भरती नाही रेल्वे बोर्ड, रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पुढील आदेश येईपर्यंत नवीन पदांसाठी भरती करणार नाही. सुरक्षा पदांसाठी सवलत देण्यात येणार आहे. हे वाचा- राहुल गांधी आदिवासीच्या मुलांना करणार ‘स्मार्ट’; सुरू केली नवी योजना रेल्वे बोर्ड गेल्या दोन वर्षात तयार केलेल्या पदांचा आढावा घेईल. जर अद्याप या पदांसाठी भरती झालेली नसेल तर एकतर संपूर्ण रिक्त जागा रद्द केली जाईल किंवा फक्त 50० टक्के सुरक्षेशी संबंधित पदे रिक्त केली जातील. खर्च कमी करण्यावर रेल्वेचं लक्ष यामुळेच रेल्वेने आपला खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवीन भरती रोखण्यात आली असून जुन्या पदांवर आवश्यकतेनुसार बदल करण्याचा निर्णय याच मार्गाने आहे. या व्यतिरिक्त रेल्वे आता खासगी गाड्याच्या संचालनावरही लक्ष केंद्रित करीत आहे. 2023 पर्यंत याची सुरुवात होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान देशात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा 6 लाखांच्या घरात गेला आहे. तर, देशात आतापर्यंत 89 लाख जणांची चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला चाचणी क्षमता जवळपास 10 पट वाढवण्याची गरज आहे. संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात