Home /News /pune /

पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा

पुण्यात जर लॉकडाऊन वाढलं तर आम्ही आत्मदहन करू, व्यापारी वर्गाचा थेट इशारा

23 जुलैनंतर जर लॉकडाऊन वाढवला तर व्यापारी आत्मदहन करतील असा इशारा व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

पुणे, 20 जुलै : अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान होत असलेल्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर पुणे व्यापारी संघाने तीव्र इशारा दिली आहे. 23 जुलैनंतर जर लॉकडाऊन वाढवला तर व्यापारी आत्मदहन करतील असा इशारा व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. पण तरीदेखील लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्ण हजारोच्या संख्येने वाढले. या सगळ्यात मात्र व्यापार उध्वस्त होत चालला आहे. सरकारने व्यापाऱ्यांना काहीही मदत केलेली नाही. त्यामुळे आता जर लॉकडाऊन वाढवला तर काही व्यापारी आत्महत्या करतील असा इशारा पुणे मर्चंट चेंबरनंसुद्धा दिला आहे. पुण्यात जोडप्याच्या लग्नामुळे कोरोनाचा कहर, एकाच कुटुंबातील 17 जण पॉझिटिव्ह कोरोनामुळे राज्यात सतत लॉकडाऊन वाढत आहे. सगळे व्यवहार, व्यापार बंद असल्यामुळे मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जर लॉकडाऊन वाढलं तर थेट उपोषण आणि आंदोलनाचा इशारा व्यापारी वर्गाकडून देण्यात येत आहे. पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई पुण्यात 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान लॉकडाऊन 'पुणे शहरात लवकरच कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात येईल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात थोडा वेळ लागेल. मात्र व्हेंटिलेटर,बेड्स कमी पडणार नाहीत असं नियोजन आहे. लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे, असं आम्ही कुणीच मानत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केसेस वाढल्या. आता पुणे शहर आणि ग्रामीण भागात मृत्यू दर कमी झाला आहे,' अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. पुढच्या 2 आठवड्यात मुंबईच्या या भागात कोरोना आटोक्यात येईल, महापौरांची माहिती पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले की, 'लॉकडाऊन काळात इंडस्ट्री सुरूच आहेत. याबाबत एकही तक्रार नाही. यापुढे आम्ही कंटेन्मेंट झोन्सवर लक्ष केंद्रित करू. पुणे जिल्ह्यात आगामी काळात लॉकडाऊन वाढवावा अशी परिस्थिती येणार नाही. मात्र काहीना काही उपाय योजना कराव्या लागतील जसं फक्त रविवारी लॉक डाऊन. मात्र अजून याबाबत निर्णय झालेला नाही,' असं नवलकिशोर राम यांनी म्हटलं आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus, Pune, Pune news

पुढील बातम्या