सुमित सोनवणे, दौंड पुणे, 20 जुलै : पुण्यात कोरोनाचे धक्कादायक आकडे सतत वाढतच आहेत. अशात दौंड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दौंड तालुक्यातील कासुर्डीमधल्या कोरोना पॉझिटिव्ह नवरा-नवरीमुळे एकाच कुटंबासह नातेवाईक मिळून तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचं लग्न झालं होतं. त्यांना त्रास जाणवू लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील आज सासरच्या कुटुंबातील लोकांच्या केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज आला. दौंड तालुक्यातील एकाच दिवसांत 27 जण कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. कासुर्डी इथल्या नवरदेवाचे उरळी कांचन इथल्या नवरी मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरा-नवरीला त्रास होऊ लागल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासरच्या 34 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जवळच्या कुटुंबातील 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झालं आहे. पुढच्या 2 आठवड्यात मुंबईच्या या भागात कोरोना आटोक्यात येईल, महापौरांची माहिती आता 17 जणांना कोरोना झाल्यानं दौंड तालुक्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या आजही सुरूच राहीला. आज एकाच दिवसांत 27 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत . यात कासुर्डीतील 17 जणांखेरीज बोरीभडक इथं 4 जणांना कोरोनाची लागण झाली. पाटस इथल्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर मुलगी, पत्नी व जावई या तिघांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे खामगाव, केडगाव, वाटलूज, सहजपूर व राजेगाव इथे प्रत्येकी एक जण कोरोनाग्रस्त आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. पवारांवर लिहलेली अश्लील पोस्ट पोलीस पाटलाला भोवली, अशी झाली कारवाई दरम्यान, अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान होत असलेल्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पुणे शहरात लवकरच कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात येईल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात थोडा वेळ लागेल. मात्र व्हेंटिलेटर,बेड्स कमी पडणार नाहीत असं नियोजन आहे. लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे, असं आम्ही कुणीच मानत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केसेस वाढल्या. आता पुणे शहर आणि ग्रामीण भागात मृत्यू दर कमी झाला आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.